सच्चीयाय माताजी नवदुर्गा मंदिराचे रौप्य महोत्सवी वर्ष
पुणे : प्रमिला नौपतलालजी साकला चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी शारदीय नवरात्रौत्सवाचे आयोजन सच्चीयाय माताजी नवदुर्गा मंदिर, पीआयसीटी महाविद्यालयाच्या समोर, भारती विद्यापीठ येथे करण्यात येते. देवांचा उत्सव हा साजरा झालाच पाहिजे अशी संस्थापक स्व. नौपतलालजी साकला यांची श्रद्धा होती, याच श्रद्धेला समोर ठेवून ट्रस्टच्या वतीने या उत्सवाचे साजरा करण्यात येतो. गेल्या २४ वर्षापासून मंदिरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.
सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील ९ दिवस देवी समोर ९ वेगवेगळ्या प्रकारच्या रूपाने देण्यात येणार आहे. यावर्षी देखील देवीसाठी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. दर्शनासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी होते, मात्र यावर्षी कोरोनचे सर्व बंधने पाळून देवीचे दर्शन भाविकांना करता येणार असल्याची माहिती ट्रस्टचे लतीका व रवी साकला यांनी दिली. रंजना व राजेश कुमार साकला यांचे या उपक्रमात महत्त्वाचे योगदान आहे. ट्रस्ट व मंदिराच्या वतीने कोरोना काळात मोठ्या प्रमाणात फूड पॅकेट्स, अन्नधान्य, औषधे, पाण्याच्या बाटल्या आदी साहित्याचे वाटप करण्यात आले.
