Tuesday, August 4, 2026
Latest NewsPUNE

पुण्यातील 4 हजार महिला स्वच्छ कर्मचार्‍यांना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप

पुणे : दी इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब आणि स्वच्छ (पुणे सेवा सहकारी संस्था लिमिटेड)  यांच्या संयुक्त विद्यमाने ऑक्टोबर सेवा सप्ताह अंतर्गत  मासिक पाळी आरोग्य जागृती करण्यात आली. यावेळी शहरातील स्वच्छ च्या महिला कर्मचाऱ्यांना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले. शहरातील ४ हजार स्वच्छ कर्मचाऱ्यांना सप्ताहांतर्गत सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात येणार आहे.

टिळक रोड क्षेत्रीय कार्यालयात उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वच्छचे जिल्हा संचालक हर्षद बर्दे,  लायन्स क्लबचे जिल्हा प्रांतपाल  हेमंत नाईक, नरेश राठी, दीपक लोया, सतीश सांडभोर, परिणीता देशपांडे, ज्योतीकुमार अगरवाल, रामेश्वर लाहोटी, अलका डोंगरे, योगेश पोद्दार, उपेंद्र कौल, राशिदा संतरामपूरवाला, अमोल भोंगळे, चंचला गायकवाड यावेळी उपस्थित होते.

लायन्स क्लब ऑफ पुणे अशोकनगर गोल्ड, लायन्स क्लब ऑफ पूना सेंट्रल, लायन्स क्लब ऑफ पुणे लोटस, लायन्स क्लब ऑफ पूना गणेशखिंड, लायन्स क्लब ऑफ पुणे डाऊनटाऊन, लायन्स क्लब ऑफ पुणे रॉयल, लायन्स क्लब ऑफ पुणे विधिज्ञ या लायन्स क्लबच्या सदस्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading