Tuesday, August 4, 2026
Latest NewsPUNE

Pune – मनसे महिला शहर अध्यक्षपदी माजी नगरसेविका वनिता वागस्कर

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला संघटनेच्या पुणे शहर अध्यक्षपदी माजी नगरसेविका वनिता वागस्कर यांची नियुक्ती करण्यात आली. तर विद्यमान महिला अध्यक्षा ऍड. रुपाली पाटील यांच्याकडे राज्याच्या महिला उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

तसेच उपशहर अध्यक्ष पदी पदमीनी साठे, जयश्री पाथरकर, अस्मिता शिंदे ह्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी पक्षाचे नेते अनिल शिदोरे, राजेंद्र वागस्कर, शहराध्यक्ष वसंत मोरे, माजी शहराध्यक्ष रुपाली पाटील, पक्षाचे सरचिटणीस, उपाध्यक्ष, विभाग अध्यक्ष व माजी नगरसेवक उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading