मर्सिडीझ-बेंझने एस-क्लासचे भारतात उत्पादन सुरु केले
पुणे: भारतातील सर्वात मोठी लक्झरी कार उत्पादक कंपनी मर्सिडीझ-बेंझने आपली सर्वात नवीन एस-क्लास बाजारपेठेत दाखल केली आहे. ही कार पुण्यातील चाकण येथील मर्सिडीझ-बेन्झच्या अत्याधुनिक उत्पादन कारखान्याच्या असेम्ब्ली लाईन्सवर तयार करण्यात आली आहे. जगातील सर्वोत्कृष्ट कार म्हणून गणली जाणारी नवीन एस-क्लास या ब्रँडची इतकी भुरळ का पडते ते दर्शवते आणि ड्रायव्हिंग असिस्टंस, सुरक्षा व संवाद या सर्व बाबतीत अनेक नवीन मानव-केंद्रित नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांसह ऑटोमोटिव्ह लक्झरी विभागाची नवी व्याख्या रचत आहे. एस-क्लास आता अधिक जास्त इंटेलिजंट बनली आहे, इतकेच नव्हे तर या गाडीने ड्रायव्हिंग अनुभवाला देखील पूर्णपणे नव्या स्तरावर नेऊन पोहोचवले आहे.
मर्सिडीझ-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ मार्टिन श्वेन्क व ऑपरेशन्स विभागाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पियुष अरोरा यांनी संपूर्णतः नवी ‘मेड इन इंडिया‘ एस-क्लास कंपनीच्या असेम्ब्ली लाईन्सवरून रोल-आउट केली असून देशभरातील सर्व मर्सिडीझ-बेंझ फ्रँचायझी पार्टनर्सकडे तसेच मर्सिडीझ-बेंझ इंडियाच्या ई-कॉमर्स चॅनेलवर (www.shop.mercedes-benz.co.in) ती ऑर्डरींगसाठी उपलब्ध असणार आहे.
एस-क्लासच्या सीबीयू “लॉन्च एडिशन” ला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता मर्सिडीझ-बेंझ आपल्या भारतीय ग्राहकांसाठी सादर करत आहे स्थानिक पातळीवर तयार करण्यात आलेले व्हर्जन, जे मर्सिडीझ-बेंझच्या या सर्वात प्रमुख गाडीसाठीच्या ग्राहकांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करेल. एस-क्लासच्या उत्पादनामध्ये पुण्यातील चाकण येथील मर्सिडीझ-बेंझ इंडियाच्या जागतिक दर्जाच्या उत्पादन कारखान्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण सुविधांना समाविष्ट करण्यात आले आहे. संपूर्णपणे अचूक, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर आणि लवचिक प्रक्रिया यामुळे या उत्पादनाचा दर्जा जागतिक पातळीवरील सर्वाधिक काटेकोर मानकांना अनुसरून असून त्यामुळे भारतात लक्झरी गाडयांच्या उत्पादनामध्ये नवा मापदंड रचला गेला आहे.
नवीन एस-क्लासमध्ये कारसाठीच्या डिजिटायझेशनचा उपयोग करण्यात आला आहे, जे गाडीतील ड्रायव्हर आणि प्रवासी या दोघांच्याही गरजा व इच्छांना खूप छान प्रतिसाद देते. नवीन एस-क्लास सादर करून मर्सिडीझ-बेंझने लक्झरी ऑटोमोटिव्ह विभागातील डिझाईन नावीन्य, श्रेणी कामगिरी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा दर्जा सातत्याने उंचावण्याची आपली परंपरा कायम राखली आहे.
मर्सिडीझ-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ मार्टिन श्वेन्क यांनी सांगितले, एस-क्लासच्या प्रत्येक नव्या आवृत्तीची अतिशय आतुरतेने वाट पाहिली जाते आणि एस-क्लासची प्रत्येक नवी आवृत्ती ऑटोमोटिव्ह उद्योगक्षेत्रामध्ये नवे मापदंड रचते.
