Tuesday, August 4, 2026
Latest NewsPUNE

उत्तर प्रदेशातील लखीमपूर  घटनेचा निषेध करण्यासाठी 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद -प्रदीप गारटकर

पुणे: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी या गावातील शेतकऱ्याना केंद्रातील मंत्र्यांच्या गाडीखाली चिरडून मारण्याचा प्रकार हा अत्यंत निदनिय व   तीव्र चीड आणणारा आहे या घडलेल्या निर्दय कृत्याचा निषेध म्हणून सोमवार दिनांक 11 ऑक्टोंबर 2021रोजी महाविकास आघाडीतल्या घटक पक्षानी  महाराष्ट्र बंद पुकारला आहे.अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.
 
या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे  शरद सोनवणे ,कॉँग्रेस आमदार संजय जगताप, रमेश कोंडे , माऊली कटके , महेश पासलकर ,बाळासाहेब चांदोरे उपस्थित होते.

प्रदीप गारटकर  म्हणाले ,भारत हा कृषिप्रधान देश असताना या शेतकऱ्यांना दिली जाते याबद्दल देशभरात प्रचंड संताप आहे असे महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी शेतकर्‍याची हत्या करणाऱ्या भाजप सरकारचा निषेध केला पाहिजे व शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.

शरद सोनवणे म्हणाले, उत्तर भारतातील शेतकरी गेले आणि त्यांना आपल्या हक्कासाठी केंद्राचे मोदी सरकार कडे शांततेत आंदोलन करून आपल्या म्हणणे सरकार पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत .परंतु वेळोवेळी राज्य सरकारतर्फे सामन्याचा पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला .त्यामुळे त्यांना पूर्णतः शेतकरी आंदोलन साम दाम दंड भेद वापरून देखील संपन्न नसल्यामुळे शेतकऱ्यांना संपवण्याचा घाट आता भाजप सरकारने चालविला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading