Tuesday, August 4, 2026
Latest NewsPUNE

कर्तृत्ववान महिलांचा उद्योगिनी हिरकणी पुरस्कार देवून सन्मान

पुणे : महिलांनी महिलांसाठी सुरू केलेला उद्योगिनी समूहाने उद्योगिनी हिरकणी सन्मान २०२१ सोहळा नुकताच पार पडला. उद्योगिणी समुहाच्या संचालिका पल्लवी वागस्कर यांनी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून  आनंद पिंपळकर, ज्ञानश्री फाउंडेशनचे अध्यक्ष जोहरभाई चुनावाला, अमर काळे,  कृष्णा वर्मा,  जागृती सोनी, भक्ती कोटे व सामाजिक कार्यकर्त्या संजीवनी बालगुडे आदी मान्यवर उपस्थित होते

आदी मान्यवर उपस्थित होते. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह तुळशीचे रोप, मेडल आणि पुस्तिका देण्यात आली. या वेळी “मी हिरकणी” या पुस्तिकेचे अनावरण देखील करण्यात आले.

या प्रसंगी आनंद पिंपळकर बोलताना म्हणाले की आज देशभरातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या निवडक २५ महिलांना हिरकणी हा पुरस्कार माझ्या हस्ते देताना मला अभिमान वाटतोय. उद्योग क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग कौतुकास्पद आहे. नवरात्रीच्या प्रसंगी आदिशक्तीचे रूप असलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान म्हणजे संपूर्ण स्त्री वर्गाला प्रेरणा देणार आहे.

पल्लवी वागस्कर म्हणाल्या की उद्योगिनी समूह हा संपूर्ण देशात तसेच ऑस्ट्रेलिया, कॅनडा या ठिकाणी कार्यरत आहे. यामध्ये २० हजार महिलांचा समावेश आहे. यामध्ये महिलांना व्यवसाविषयी मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाते. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना कदम यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading