Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

महागाई विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने गॅस सिलिंडरचे श्राद्ध घालत आंदोलन

पुणे: गेल्या दोन वर्षापासून मोदी सरकारने गॅस,पेट्रोल, डिझेल चे दर हे वाढवले आहेत. दोन दिवसांपूर्वी मोदी सरकारने  गॅसदरवाढ तब्बल 15 रूपयांनी केली आहे. या वाढलेल्या महागाई विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने  राज्याभरात सातत्याने आंदोलने केली जात आहेत. याच मुद्यावरून आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसने पुणे शहरात अलका टॉकीज चौक येथे गॅस सिलिंडरचे श्राद्ध घालत अनोखे आंदोलन केले.

या आंदोलना वेळी मोदी सरकारने वाढलेल्या महागाई विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसने निषेध व्यक्त केला. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यश रुपाली चाकणकर यांनी केले. यावेळी राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्षा मुणाल वाणी, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, अनिता पवार, ज्योती सुयवशी, प्राजक्ता जाधव,रत्ना नाईक,मंगल ताई,सविता मारणे,सोनाली उजागरे आदी मोठ्या संखेने उपस्थित होते.

रुपाली चाकणकर म्हणाल्या,गेल्या दोन महिन्यापासून गॅसचे दर भरपूर वाढवले आहेत. या गॅसच्या सबसिडी मधून केंद्र सरकारला पैसे भेटत आहेत. सर्वसामान्य नागरिकांचा केंद्र सरकारने अंत पाहिला आहे. दोन महिन्यापूर्वी 5 व 10 रुपयाने गॅस वाढत होता. पण तो दोन दिवसापूर्वी 15 रुपयांनी वाढला यातून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला पाहिजे. यासाठी आज आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला पार्टी अख्या राज्यभरात गॅस सिलिंडर श्राद्ध घालत आंदोलन करत आहोत.

प्रशांत जगताप म्हणाले, उत्तर प्रदेशातील लखिमपुर येथे एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले ही घटना दुर्दैवी असून पंतप्रधान नरेंद्र मोदीनी यावर काहीतरी प्रतिक्रिया द्यायला पाहिजे. मोदी सरकारला आमची एक विनंती आहे की सर्वसामान्य नागरिकांचा अंत बघु नका.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading