नवी मुंबईतील न्हावा शेवा बंदरातून 125 कोटींचं हेरॉईन जप्त
नवी मुंबई : गुजरात येथे आदानी ग्रुपच्या मुंद्रा बंदरावर मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलेले ड्रग्ज, त्यानंतर मुंबईतील क्रुज वरील ड्रग्ज पार्टीवर टाकलेला छापा यानंतर आता पुन्हा एकदा मुंबईची काळजी वाढवणारे एक प्रकरण समोर आले आहे. नवी मुंबईतील न्हावा शेवा बंदरातून तब्बल 125 कोटी रुपयांचे हेरॉईन ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. महसूल गुप्तचर संचालनालया (Directorate of Revenue Intelligence)च्या पथकाने ही मोठी कारवाई केली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, छाप्यात महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाने एका कंटेनर मधून 25 किलोहून अधिक हेरॉईन ड्रग्ज जप्त केले आहेत. यांची किंमत जवळपास 125 कोटीं रुपये इतकी आहे. या प्रकरणी जयेश संघवी या व्यापाऱ्याला अटक करण्यात आली आसून त्याला 18 ऑक्टोबर पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. DRI अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाव्हा शेवा येथे कंटेनरमध्ये सापडलेले हेरोईन हे इराणमधून आणण्यात आले होते.
फोटो – संग्रही
