Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

लाखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे 11 ऑक्टोबर ला पुणे बंदचे आवाहन

पुणे: चार दिवसा पूर्वी उत्तरप्रदेशातील लाखीमपूर येथे आंदोलक शेतकऱ्यांना  केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने चिरडले होते. या घटनेत 8 शेतकऱ्यांचा  मुत्यू झाला आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी मधील  घटक पक्षानि 11 ऑक्टोबर ला राज्य महाराष्ट्र बंद चे आवाहन केले आहे.आज पुण्यात महाविकास आघाडी मधील घटक पक्षानी पत्रकार परिषद घेवून 11 ऑक्टोबर ला पुणे बंद करण्याचे आवाहन  केले.

या पत्रकार परिषदेला काँग्रेस पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष रमेश बागवे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी, शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर प्रवक्ते अंकुश काकडे, काँग्रेसचे गट नेते आबा बागुल, नितीन पवार आदी उपस्थित होते.
प्रशांत जगताप म्हणाले,लाखीमपूर येथे आंदोलक  शेतकऱ्यांना   केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने चिरडले होते.या या घटनेत 8 जनाचा मुत्यू झाला  आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही
11 ऑक्टोबर ला पुणे बंद करण्याचे आवाहन केले आहे.या बंद मध्ये पुण्यातील सगळे  व्यापारी
सहभागी होणार आहेत.

संजय मोरे म्हणाले, आरोपीला अटक केली नाही. शेतकऱ्याचे आंदोलन सुरू आहे.ही अतिशय दुर्देवी घटना आहे.या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही पुण्यातील व्यापाऱ्यांना बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

रमेश बागवे म्हणाले,मोदी सरकारने या घटनेची चोकशी केली पाहिजे.पुण्यातील व्यापाऱ्यांच्या बरोबर आम्ही या सभेत बंद होण्यासाठी आम्ही चर्चा करत आहोत.  ते या बंद मध्ये निश्चित  सहभागी होतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading