रामविलास पासवान यांच्या प्रथम स्मृतीदिनी लोकजनशक्ती पार्टीकडून अभिवादन
पुणे : लोकजनशक्ती पार्टी पुणे शहर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात येथे पक्षाचे संस्थापक पद्मभूषण स्व. रामविलास पासवान यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी पुणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट, प्रदेश सरचिटणीस अमर पुणेकर, सरचिटणीस के.सी. पवार, संघटक आप्पा पाटील , जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंकल सोनवणे , उपाध्यक्ष संजय चव्हाण , शिरूर तालुका अध्यक्ष शरद टेमगिरे , उपाध्यक्ष संतोष वायदंडे , कार्याध्यक्ष रवी नरवाडे , अनिल हातागळे , संतोष पिल्ले , जीवन शिंदे , योगीता साळवे , कुसुम दहिरे , युवा अध्यक्ष शुभम आल्हाट , युवा उपाध्यक्ष राहुल कुलकर्णी , युवा सरचिटणीस आदिनाथ भाकरे , श्रीनाथ अडागळे , बंडू वाघमारे, पिंटू भोसले आदी मान्य उपस्थित होते.
