Friday, June 19, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

कार्यकर्त्यांना भावूक न होण्याचे अजित पवार यांचे आवाहन

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित साखर कारखाने,  संचालकांच्या घरी, पार्थ पवार यांच्या मुंबईतील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाकडून गुरुवारी छापे टाकण्यात आले. तसेच साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला. त्यानंतर आज पुण्यात विधान भवन च्या समोर अजित पवार समर्थकांनी We Support Ajit Dada असे  फळक झलकवत अजित पवारांची  पाठराखण केली आहे. त्याचवेळी अजित पवार कोरोना आढाव बैठक घेण्यासाठी तेथून आत गेले. तेंव्हा अजित पवार कार्यकर्त्यांचे प्रेम बघून भावूक झाले . तसेच कार्यकर्त्यांना आजीतदादा म्हणाले एवढे भावूक होवु नका. 

कोरोना आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, आयकर विभागाने जी कारवाई केली आहे. ती एकदम चुकीची आहे. त्यांनी माझ्या बहिणी च्या घरी कारवाई करायला नव्हती पाहिजे. आयकर विभाग यांनी केलेल्या चौकशीत  त्यांच्या चौकशीत कोणताच व्यक्तय आणणार नाही. त्यांनि सगळी चौकशी केल्यानंतर स्पष्टीकरण देणार मी कुठेही  पळून जाणार नाही असेही  अजित पवार म्हणाले.

कोणाच्या काळात कोणते  कारखाने विकले त्यांची अवस्था आज काय हायकोर्टाने याची माहिती दिली का हे सगळे आयकर विभागाने चौकशी केल्यानंतर मी बोलेल असेही अजित पवार म्हणाले.
लखिमपूर  घटनेवर त्यांनी भाष्य केले ते म्हणाले लखीमपूरची घटना दुदैवी तो काळा दिवस आहे. एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले एक दुर्दैवी घटना आहे म्हणून महाविकास आघाडी सरकारने 11 ऑक्टोंबर ला महाराष्ट्र बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सोबत घेणार की नाही अशी चर्चा आहे त्यावर अजित पवार म्हणाले पुणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेला सोबत घेण्याचा विचार आहे वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे पवार यांनी सांगितले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading