fbpx
Thursday, April 25, 2024
BusinessLatest News

एलजी इलेक्ट्रॉनिक्स ने पहिल्या प्रीमियम शॉप-इन-शॉपचे उद्घाटन भोसरीच्या विजय सेल्समध्ये केले

पुणे: भारतातील ग्राहकोपयोगी वस्तूंच्या उद्योगातील रिटेलिंगचे मानक नव्याने स्थापन करण्याच्या वचनपूर्तीचा भाग म्हणून एलजी इलेक्ट्रॉनिक्सने आपल्या पहिल्या प्रीमियम शॉप-इन-शॉपचे उद्घाटन भोसरीच्या विजय सेल्समध्ये केले आहे.

देशातील रिटेल क्षेत्राच्या सध्याच्या आव्हानात्मकमागण्या पूर्ण करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या या शॉप-इन-शॉपचे उद्घाटन एलजी इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड चे  ब्रांच मॅनेजर सचिन खळदकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी विजय सेल्स चे ऑपरेशन हेड ज्योती मित्रा उपस्थित होते.

आजच्या अत्याधुनिक बाजारपेठेतील खरेदीचा अनुभव अधिक चांगला करण्याचे उद्दिष्ट या उपक्रमापुढे आहे आणि ते घराच्या सर्व जीवनशैलीविषयक गरजांची पूर्तता एका छताखाली करणारे दुकान म्हणून काम करेल.

घरगुती उपकरणांचा आघाडीचा ब्रॅण्ड एलजी इलेक्ट्रॉनिक्सने आपली हेल्थ अँड हायजीन श्रेणी स्टायलरच्या माध्यमातून विस्तारली आहे. हे स्टीम क्लोदिंग केअर पोर्टफोलिओतील एक नवोन्मेषकारी उत्पादन आहे.

स्टायलर श्रेणी भारतात २०१८ पासून बीटूबी विभागामध्ये उपलब्ध होती. हायजिन केअर उपकरणांना वाढती मागणी लक्षात घेऊन एलजीने हे उपकरण रिटेल ग्राहकांना नवीन जीवनशैलीच्या मागण्या पूर्ण  करण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. क्लोदिंग केअरमधील स्टायलर बाजारात आणणारा एलजी इलेक्ट्रॉनिक्स हा जगातील पहिला ब्रॅण्ड ठरला आहे.

एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचे ब्रांच मॅनेजर सचिन खळदकर यावेळी म्हणाले, एलजी इलेक्ट्रॉनिक्स हा भारतातील ग्राहकांमध्ये सर्वांत लोकप्रिय व विश्वासार्ह ब्रॅण्ड्सपैकी एक आहे. एक ग्राहककेंद्री ब्रॅण्ड म्हणून

एलजी आपल्या ग्राहकांसाठी सर्वोत्तम अनुभवासह अर्थपूर्ण नवोन्मेष देण्यासाठी कायमच वचनबद्ध राहिला आहे. अलीकडेच आम्ही सुरू केलेल्या ख्वाइशों से खुशियों तक सीझन ३ आणि एलजी प्रीमियर लीग २ याउत्सवी अभियानांमुळे ग्राहकांना एलजीच्या नवोन्मेषकारी उत्पादनांच्या माध्यमातून त्यांची घरे नव्याने सुसज्ज करणे आणि अद्ययावत करणे शक्य होणार आहे. आमच्या नवीन ऑफर्सही ग्राहकांना आकर्षित करून घेतील आणि आपले जीवन समृद्ध करण्याची संधी त्यांना देतील, असा आत्मविश्वास आम्हाला वाटतो.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading