सरकारने महापािलकेचे जीएसटी, मुद्रांक शुल्काचे एकुण अकराशे काेटी रुपये थकविले- हेमंत रासणे
पुणे : राज्य सरकारने महापािलकेचे जीएसटी, मुद्रांक शुल्काचे एकुण अकराशे काेटी रुपये थकविले अाहे अशी माहीती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी िदली. हे पैसे मिळावेत यासाठी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्थायी समितीच्या बैठकीनंतर पत्रकार परीषदेत रासने यांनी यासंदर्भात माहीती िदली. राज्य सरकारकडून माेठ्या प्रमाणावर महापािलकेच्या वाट्याचे पैसे येणे बाकी असल्याचा दावा केला. महापािलकेच्या हद्दीत चार वर्षापुर्वी अकरा गावे अािण नुकतीच तेवीस गावे समाविष्ठ झाली अाहे. या गावातील जीएसटी अािण मुद्रांक शुल्काच्या पंचवीस काेटी रुपयांची राज्य सरकारकडे थकबाकी अाहे. मुद्रांक शुल्क िवभागाकडून वसुल केल्या जाणाऱ्या मुद्रांक शुल्काच्या एक टक्का रक्कम ही महापािलकेला िदली जाते. राज्य सरकारने अाॅक्टाेबर २०१९पासून सप्टेंबरअखेरपर्यंत एकुण ३३३ काेटी ७४ लाख रुपये थकविले अाहेत.
जीएसटी जुलै २०१७ पासुन लागू झाला अाहे. राज्यसरकारने एकुण ७३६ काेटी २० लाख रुपये थकविले अाहे. यामध्ये यापुर्वी समाविष्ट झालेल्या अकरा गावांतील १७ काेटी ८१ लाख रुपये, नुकतेच समाविष्ट केलेल्या २३ गावांतील ९ काेटी ८१ लाख रुपयांच्या जीएसटीचा समावेश अाहे, अशी माहीती रासने यांनी िदली.
राज्यसरकारला जीएसटीचा वाटा हा केंद्र सरकारकडून मिळत अाहे, परंतु या जीएसटीच्या रक्कमेतील महापािलकेचा वाटा राज्य सरकारने थकीत ठेवला अाहे. तर मुद्रांक शुल्क हे राज्य सरकारच वसुल करीत असुन, ही रक्कम त्यांच्याकडे असुनही ती देखील वेळेत मिळत नसल्याची खंत रासने यांनी व्यक्त केली. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अािण पालकमंत्री अजित पवार, नगर िवकास मंत्री एकनाथ िशंदे इतरांना निवेदन देणार असल्याचे रासने यांनी नमूद केले.
