Thursday, November 19, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

BIG BREAKING NEWS – NCB ची क्रूझ वरील कारवाई हा भाजपचा ‘फर्जीवाडा’ – नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

क्रूझ वरील कारवाई ही फसवी, निव्वळ बनाव 

बॉलीवूडला बदनाम करण्याचा भाजपचा डाव 

आर्यन खानवर हा मोहरा, खर टार्गेट शाहरूख खान एनसीबीनेच या प्रकरणाच्या बातम्या पेरल्या 

क्रुझवर पंचनामा का केला नाही?  

मुंबई – एनसीबी (NCB) ने केलेल्या एका  क्रूझ वरील छापेमारीत बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान यांच्यासह आठ जणांना ताब्यात घेतले. मात्र हा संपूर्ण प्रकार आज एका नव्या वळणावर पोहचला असून एखाद्या ‘वेबसिरिजाचा प्लॉट’ असावा असे वळण या प्रकाराला मिळाले आहे. एनसीबी चा अधिकारी नसताना के. पी. गोसावी  हा आर्यन ला आणि मनीष भानुशाली हा अरबाज मार्चंट याला ताब्यात घेतात कसे ? आणि एनसीबीच्या कारवाईत यांचा सहभाग कसा? असा सवाल उपस्थित करत  NCB ची क्रूझ वरील कारवाई हा भाजपचा फर्जीवाडा असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

कोण आहे मनीष भानुशाली ?

अरबाज भानुशाली याला एनसीबी कार्यालयात नेणारी व्यक्ती ही मनीष भानुशाली आहे. भानुशाली हा एनसीबीचा अधिकारी नाही, असे एनसीबीने आधीच जाहीर केले आहे. मग त्याने अरबाजला कोणत्या अधिकाराने ताब्यात घेतले हा प्रश्न नवाब मालिक यांनी आज पस्थित केला. भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष असून पंतप्रधान मोदींसह अमित शहा, नारायण राणे, प्रकाश जावडेकर, देवेंद्र फडणवीस, आशीष शेलार अशा अनेक बड्या भाजप नेत्यांसोबत त्यांचे फोटो आहेत.  तसेच आदाणी यांच्या मालकीच्या मुंद्रा बंदरावरील कारवाई नंतर  दरम्यान गुजरात आणि दिल्लीत मंत्र्यांच्या घरी होता असेही मलिक यांनी सांगितले.

कोण आहे के. पी. देसाई ?

आर्यन खान याला एनसीबी कार्यालयात नेणारी व्यक्ती ही के. पी. देसाई होती, असे नवाब मालिक यांनी सांगितले. ते म्हणाले, ही गोसावी एक खाजगी डिटेकटीव्ह आहे. पुण्यातील फरासखाना पोलिस स्टेशन मध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल असल्याचे ही त्यांनी सांगितले.

Leave a Reply