मान्सून प्रीमियर लीग 13 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत मुंबईच्या टायटन्स क्रिकेट अकादमी संघाला विजेतेपद
पुणे : जस क्रिकेट अकादमी पुणे यांच्या तर्फे आयोजित मान्सून प्रीमियर लीग 13 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत आयुश जाधव(नाबाद 51 धावा व 5-10)याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर मुंबईच्या टायटन्स क्रिकेट अकादमी संघाने पुण्याच्या आर्यन्स क्रिकेट अकादमी संघाचा 41 धावांनी पराभव करून विजेतेपद संपादन केले.
धानोरी येथील जस क्रिकेट अकादमीच्या प्रकाश टिंगरे मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीच्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना टायटन्स क्रिकेट अकादमी संघाने 20षटकात 3बाद 105धावाचे आव्हान उभे केले. सलामीचा फलंदाज आयुश जाधवने 56 चेंडूत 3चौकारासह नाबाद 51धावांची खेळी केली. आयुशला आर्य काळेने 11, आयुश शेटेने 17 धावा काढून साथ दिली. आर्यन्स क्रिकेट अकादमीकडून अर्णव गोळे(1-25), ईशान मिश्रा(1-13), अर्जुन गोडसे(1-7)यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. याच्या उत्तरात आर्यन्स क्रिकेट अकादमी संघाचा डाव 16 षटकात 64 धावावर कोसळला. यात शौनक शेवडे 25, युवराज चव्हाणडाके 11 यांनी थोडासा प्रतिकार केला. टायटन्स क्रिकेट अकादमीकडून आयुश जाधवने फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीतही कमाल दाखवत 10 धावात 5 गडी बाद करून संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. आयुशला आरुष नाडगेरीने 17धावात 2 गडी तर, धैर्य रसमने 13धावात 1 गडी बाद करून चांगली साथ दिली. सामनावीर आयुश जाधव ठरला.
स्पर्धेतील विजेत्या टायटन्स क्रिकेट अकादमी संघाला करंडक व आकर्षक अशी पारितोषिके देण्यात आली. याशिवाय मालिकावीर म्हणून आयुश शेटे याला सायकल पारितोषिक देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्राच्या 25 वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक निखील पराडकर, योगेश टिंगरे, अजय टिंगरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पराग मोरे, प्रभाकर मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:
टायटन्स क्रिकेट अकादमी(मुंबई): 20षटकात 3बाद 105धावा(आयुश जाधव नाबाद 51(56,3×4), आयुश शेटे 17(30), आर्य काळे 11, अर्णव गोळे 1-25, ईशान मिश्रा 1-13, अर्जुन गोडसे 1-7)वि.वि.आर्यन्स क्रिकेट अकादमी(पुणे): 16 षटकात सर्वबाद 64 धावा(शौनक शेवडे 25(35), युवराज चव्हाणडाके 11(16), आयुश जाधव 5-10, आरुष नाडगेरी 2-17, धैर्य रसम 1-13);सामनावीर-आयुश जाधव; टायटन्स क्रिकेट अकादमी संघ 41 धावांनी विजयी.
इतर पारितोषिके:
सर्वोत्कृष्ट फलंदाज: शौनक शेवडे(आर्यन्स क्रिकेट अकादमी, 179धावा);
सर्वोत्कृष्ट गोलंदाज: आयुश जाधव(टायटन्स क्रिकेट अकादमी, 10 विकेट);
मालिकावीर: आयुश शेटे(86 धावा व 9 विकेट).
