Thursday, November 19, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

शशिकांत पवार यांचे अध्यक्ष पदाचे सर्व अधिकार एकमताने मला देण्यात आले -राजेंद्र कोंढरे

पुणे:अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यांनी काही गैर प्रकार केल्यामुळे त्याचे अध्यक्षपद सर्व अधिकार विशेष सर्वसाधारण सभेने गोठवीलेले आहेत.त्यामुळे त्याना लोकशाही पद्धतीने निवड झालेल्या पदाधिकाऱ्याना बरखास्त करण्याचा अथवा बडतर्फ करण्याचा अधिकार घटनेप्रमाणे नाही.तसेच विशेष सर्वसाधारण सभेने या शशिकांत पवार याचे अध्यक्ष पदाचे सर्व गोठवीलेले अधिकार एकमताने मला देण्यात आले आहेत अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत अखिल भारतीय मराठा महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी दिली.

या पत्रकार परिषदेला अक्षय काडीले, अतिश गायकवाड, गुलाब गायकवाड ,कामिनी मेमाणे उपस्थित होते.
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सभासद व पदाधिकाऱ्याची विशेष सर्वसाधारण सभे मध्ये तीन महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले.

शशिकांत पवार यांनी नियमाबाह पद्धतीने आपल्या अधिकाराचा दुरपयोग करून लादलेल्या सर्व नियुक्त्या रद्द करण्यात आल्या.राज्यव्यापी मराठा संपर्क अभियानाची सुरवात करणे ,युवक विद्यार्थी , संघटन वादविने साठी निर्णय घेणे.अखिल भारतीय मराठा महासंघ मध्यवती कार्यालयाच्या मुंबई येथील इमारत पुनर्विकास लेखी माहिती घेऊन .या सभेस उपस्थित असलेल्या ताऱ्यांचे उपस्थितही साक्षी पोलिस अधिकाऱ्यांच्या शिक्षण संस्थेने तीन ऑक्टोंबर 2019 रोजी मुंबई येथील अखिल भारतीय मराठा महासंघ पुनर्वसनाबाबत अधिकार नसताना संस्थेचे केलेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची नोंद घेऊन विशेष सर्वसाधारण सभेत एकमताने शशिकांत पवार यांची अध्यक्षपदाची सर्व अधिकार ठेवलेली आहे .त्यामुळे येत्या सर्वसाधारण सभेत घेतला निर्णय सर्वच असतात0. त्यामुळे त्यांनी काढलेल्या कुठल्याही पत्रकाला कायदेशीर हक्क नाहीत. असे राजेंद्र कोंढरे म्हणाले.

Leave a Reply