ऑलिम्पिक विजेते मीराबाई चानू आणि बजरंग पुनिया अमृतांजनचे ब्रँड ऍम्बॅसॅडर्स
मुंबई : तब्बल १२८ वर्षांच्या दीर्घ, समृद्ध परंपरेचा वारसा यशस्वीपणे चालवत असलेली आणि भारतातील आरोग्यसेवा क्षेत्रातील अग्रणी कंपनी अमृतांजन हेल्थकेयरने टोकियो २०२० ऑलिम्पिक खेळांचे विजेते, वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक विजेत्या मीराबाई चानू आणि रेसलिंगमध्ये कांस्यपदक विजेते बजरंग पुनिया यांना आपले ब्रँड ऍम्बॅसॅडर पद बहाल केले आहे.
शारीरिक वेदनेपासून आराम देणाऱ्या, अमृतांजनच्या उत्पादनांच्या प्रसिद्धीमध्ये हे ऑलिम्पिक पदक विजेते सहभागी होतील. या पोर्टफोलिओमध्ये बॅक पेन रोल-ऑन, जॉईंट मसल स्प्रे आणि पेन पॅच यांचा समावेश आहे.
मीराबाई चानू यांनी सांगितले, “वेदनांपासून आराम मिळवून देणाऱ्या अमृतांजनच्या उत्पादनांच्या पोर्टफोलिओच्या प्रमोशनसाठी त्यांच्यासोबत सहयोग करताना मला आनंद होत आहे. एक ऍथलिट म्हणून मला अनेक शारीरिक वेदनांना सामोरे जावे लागते आणि तरीही मी मेहनत कायम सुरु ठेवते. जेव्हा वेदना सहन करण्याच्या पलीकडे असतात तेव्हा बॅक पेन रोल-ऑनसारख्या अमृतांजनच्या उत्पादनांची मला खूप मदत होते. याची हॉट ऍक्शन हीट थेरपी अवघ्या ३० सेकंदात काम करू लागते आणि तातडीने व दीर्घकाळ टिकून राहील असा आराम मिळवून देते.”
बजरंग पुनिया यांनी सांगितले, “उत्तम कामगिरी करणारा खेळाडू म्हणून मी नेहमी अशा संधीच्या शोधात असतो ज्यामुळे मी माझ्या प्रतिस्पर्ध्यावर मात करू शकेन आणि मी अमृतांजनच्या जॉईंट मसल + स्प्रेचा उपयोग करण्यासाठी उत्सुक आहे जेणेकरून मला सांधे, स्नायू आणि संपूर्ण शरीरातील वेदना कमी करण्यासाठी मदत मिळेल. कुस्तीसारख्या खेळांमध्ये तुमच्या कामगिरीइतकीच महत्त्वाची आहे रिकव्हरी म्हणजेच तुम्ही तातडीने पुन्हा तितक्याच ताकदीने उभे राहिले पाहिजे. हा स्प्रे प्रभावित स्नायूंपर्यंत पोहोचून तातडीने वेदना दूर करतो व भरपूर ट्रेनिंगनंतर किंवा स्पर्धेदरम्यान शरीराला अगदी कमी वेळात पुन्हा सज्ज करतो.”
