कारगिल आतंरराष्ट्रीय मॅरेथान रन फॉर युनिटी 31ऑक्टोबरला – संजीव शहा
पुणे:गेल्या काही वर्षांत कारगिल मॅरेथानला एक वेगळे महत्व प्राप्त होवू लागले आहे.370 कलम रद्द झाल्यानंतर व कोरोनाच्या संकट काळात होवू न शकलेली कारगिल आतंरराष्ट्रीय मॅरेथान या वर्षी सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजेच 31 ऑक्टोबरला 2021 ला राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने कारगिल मध्ये होणार आहे.
रन फॉर युनिटी या कल्पनेवर होणाऱ्या या मॅरेथान चे आयोजन सरहद पुणे आणि लडाख पोलिस यांच्या संयुक्त विद्यमानाने लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिल कारगिल जिल्हा प्रशासन कारगिल यांच्या सहकार्याने होणार असल्याची माहिती कारगिल मॅरेथॉनचे मुख्य संयोजक मुख्य संयोजक संजीव शहा यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला अरविंद बीजवे, वसंत गोखले, सुमंत वाईकर उपस्थित होते.संजीव शहा म्हणाले,5,10,21 किमी हाफ आणि 42 कीमी फूल मॅरेथॉन अशाप्रकारे नेहमीप्रमाणे तसेच टायगर हिल चॅलेंज 160 किमी अशा प्रकारात ही मॅरेथॉन पार पडणार असून यंदा कोरोनाच्या संकटामुळे आंतरराष्ट्रीय धावपटूंचा यात समावेश असणार नाही. तसेच प्रतिनिधिक स्वरुपात होणारी मॅरेथॉन 330 धावपटूचा सहभाग असेल .लडाख ऑटोनॉमस कौन्सिलचे फिरोज अहमद खान, लडाख पोलीस प्रमुख सतीश खंदारे, कारगिलच्या जिल्हाधिकारी संतोष सुखदेवे ,जिल्हा पोलीस प्रमुख अयानत अली चौधरी यांनी संयोजनासाठी पुढाकार घेतला आहे.असे संजीव शहा म्हणाले.
