Thursday, November 19, 2026
Latest NewsPUNE

पुणे नवरात्रो महोत्सवात जीवनगाैरव पुरस्कार आणि चित्रफितीचे प्रकाशन

पुणेः-कला-संस्कृती,-गायन-वादन याचा मनोहारी संगम असणारा पुणे नवरात्र महोत्सवास गुरुवार दिनांक 7आॅक्टोबर पासून प्रारंभ होत असून कोरोना परिस्थितीमुळे सांस्कृतिक कार्यक्रमांवर मर्यादा येत असल्या तरी प्रतिवर्षी देण्यात येणा-या श्री लक्ष्मी माता जीवन गौरव पुरस्कार व महिला महोत्सवातील तेजस्विनी पुरस्कार प्रदान कार्यक्रम प्रथे प्रमाणे संपन्न होणार आहे. अशी माहिती पुणे नवरात्र महोत्सवाचे संस्थापक आयोजक व पुणे मनपा काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल व महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांनी आज आयोजीत पत्रकार परिषदेत दिली. महोत्सवाचे यंदाचे 27 सावे वर्षे आहे. यावेळी पुणे नवरात्र महोत्सवाचे सदस्य रमेश भंडारी, घनश्याम सावंत,नंदकुमार कोंडाळकर आणि कोषाध्यक्ष नंदकुमार बानगुडे आदी मान्यवर उपस्थित होते .

सत्ताविसाव्या पुणे नवरात्र महोत्सवा बाबात आयोजीत पत्रकार परिषदेत माहिती देतांना आबा बागुल म्हणाले, सात ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजता शिवदर्शन येथील श्री लक्ष्मी माता मंदिरात आबा बागुल व जयश्री बागुल यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना होईल.यानिमित्त दाक्षिणात्य पद्धतीचे लक्ष्मी मातेचे मंदिर सुशोभित करण्यात आले असून रंगीत दिवे व फुलांच्या माळांनी ते सजविण्यात आले आहे.

घटस्थापनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 8 ऑक्टोबर 2021 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पत्रकार भवनच्या कमिन्स सभागृहात लक्ष्मी माता जीवन गौरव पुरस्कार प्रदान कार्यक्रम होईल. यंदा बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित डॉ. रेवा नातू आणि निर्मला गोगटे, ज्येष्ठ संपादक यमाजी मालकर वेदमूर्ती श्रीकांत दंडवते गुरुजी आणि लावणी लोककलावंत पूनम कुडाळकर यांना श्री लक्ष्मी माता जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाईल. देवीची प्रतिमा, सन्मानचिन्ह, पुस्तक, शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील.

पुणे नवरात्र महोत्सव अंतर्गत संपन्न होणाऱ्या महिला महोत्सवात दिनांक 10 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता शिवदर्शन येथील श्री लक्ष्मी माता मंदिराच्या प्रांगणात कन्या पूजन कार्यक्रम संपन्न होईल.

यंदा साहित्य अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित कोल्हापूर येथील सोनाली नवांगुळ आणि मुंबई येथील मंजुषा कुलकर्णी यांना दिनांक 11 ऑक्टोबर 2021 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पत्रकार भवन नवी पेठ पुणे येथे प्रदान केले जातील. देवीची प्रतिमा, स्मृतिचिन्ह, शाल पुस्तक व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.ज्येष्ठ साहित्यिक मंगला गोडबोले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील

14 ऑक्टोबर 2019 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पत्रकार भवन नवी पेठ पुणे येथे पुणे नवरात्र महोत्सव अंतर्गत माननीय कीर्ती शिलेदार यांच्या संगीतमय कारकीर्दीवर आधारित माननीय दीप्ती भोगले यांनी तयार केलेल्या मम सुखाची ठेव या चित्रफितीचे प्रकाशन ज्येष्ठ दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांच्या हस्ते संपन्न होईल. संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत माननीय कीर्ती शिलेदार यावेळी उपस्थित राहणार आहेत

Leave a Reply