fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsNATIONALTOP NEWS

जगभरात Facebook, Instagram व  WhatsApp ‘डाऊन’

अन् Facebook ने ही ट्विट करीत दिलगीरी व्यक्त केली  

मुंबई : फेसबुकाची मालकी असलेल्या Facebook, Instagram व  WhatsApp या सोशल मीडिया साईट्स गेल्या दोन तासांपासून डाऊन आहे. भारतात पावसामुळे ही समस्या निर्माण झाली असावी असा युजर्सचा समाज झाला होता. मात्र ट्विटरवर याबाबद मेसेज पोस्ट होवू लागल्याने जगाभारातील युजर्सला सोशल मीडिया वापरत असताना या अडचणी येत असल्याचे समोर आले आहे.

सोमवारी (दि.4) रात्री 8.00 नंतर WhatsApp, Facebook आणि अनेक सोशल मीडिया साइट्स बंद पडल्या. Facebook च्या वेबसाइटवर याबद्दल दखल घेण्यात आली आहे. Sorry, something went wrong. We’re working on it and we’ll get it fixed as soon as we can’ असा मेसेज फेसबुकने त्यांच्या वेबसाइटवर केला होता. दरम्यान ही अडचण कधी पर्यंत सोडवली जाईल याकडे सर्व युजर्सचे लक्ष आहे.

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading