Tuesday, July 28, 2026
Latest NewsMAHARASHTRA

प्रति हेक्टरी 50 हजार अनुदान मिळावे या मागणीसाठी जनशक्ती संघटनेने केले अशोक चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन

नांदेड :ऊस उत्पादक शेतकरी व महिनाभरापासून चालू असलेल्या संततधारपावसामुळे नांदेड जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, हळद,ऊस, मुग, उडीद, तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास पावसामुळे हिरावून गेलाय.यामुळे बळीराजा पुर्णतः हतबल झाला असून शेतकऱ्यांना त्वरित अनुदान मंजूर करणे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना शेतातील लाईट बील तात्काळ माफ करणे, रब्बीसाठी खते व बियाणे अनुदानित पध्दतीवर उपलब्ध करुन देण्यात यावेत व पीक नुकसानीचे प्रति हेक्टरी 50 हजार अनुदान मिळावे या मागण्यासाठी जनशक्ती संघटनेने आज जनशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अतुल खुपसे यांच्या नेतृत्वात नांदेड येथे राज्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन केले गेले.आंदोलन कर्त्यांना पोलिसांनी अटक करून सोडून देण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading