डिप्रेस्ड क्लास मिशन संस्थेच्या वतीने अनोखी जयंती साजरी
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिम्मित महात्मा फुलेंच्या वंशज अनिताताई होले यांच्या हस्ते जयंती साजरी
पुणे :महर्षी विठ्ठल रामजी यांनी स्थापन केलेल्या डिप्रेस्ड क्लास मिशन संस्थेत आज राष्ट्रपिता मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निम्मित आज संस्थेत अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते .या वेळी महात्मा फुले यांच्या वंशज अर्चना ताई होले यांच्या हस्ते प्रतिमला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी होले आपल्या मनोगतात म्हणाल्या की ,आज अतिशय ऐतिहासिक दिवस आहे .आजच्या दिवशी महत्त्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांचा जन्म झाला .त्यांचा विचार आणि कार्य पुढे नेण्याची गरज आहे .हा जयंती कार्यक्रम ही अतिशय ऐतिहासिक जागेत होत आहे ज्या संस्थेची स्थापना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली होती .
राष्टपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालाबाहदुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त व डि.सी मिशन सोसायटी आँफ इंडिया संस्थेचे ऒचित्य साधुन जयंती साजरी करण्यात आली . यावेळी जनरल सेक्रेटरी एम.डी शेवाळे (सर) अध्यक्ष डी.टी रजपुत (सर )(खजिनदार) विशालभाऊ शेवाळे मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिका शिल्पाताई भोसले मँडम मुलांच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता भोसरेकर मॅडम ,काजलताई विशालभाऊ शेवाळे डाँ भारत कराड वित्त व लेखा, अधिकारी संत गाडगेबाबा बाबा अमरावती विद्यापीठ व डाँ सुभाष पवार उप प्राचार्य सिध्दविनायक महिला काँलेज ,पुणे , डॉ.बाबासाहेब आंबेडकर काँलेजचे मुख्याध्यापक नरेश पोटे (सर) ,उप प्राचार्य सहदेव मस्के (सर), महर्षी शिंदे मुलांचे वसतिगृहाचे अधिक्षक अशोक कासुळे (सर)भालेराव, (सर)मनोज सर आदि मान्यवरांच्या उपस्थिती जयंती साजरी करण्यात आली.
