पुण्यातही सोमवार पासून शाळा सुरू होणार, महापालिका आयुक्तांचे आदेश
पुणे : राज्यशासनाच्या आदेशानुसार कोरोनामुळे जवळपास दीड वर्षांपासून बंद असलेल्या राज्यातील शाळा सोमवार (दि. 4 ऑक्टोबर) पासून सुरू होता आहे. याच आदेशाच पालन करीत पुणे शहरातील 8 वी ते 12 पर्यंतचे वर्ग सुरू करण्यास महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आज मान्यता दिली आहे. त्यानुसार, 4 ऑक्टोबर पासून पुणे शहरातील तसेच पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डातील शाळा सुरू होणार आहेत.
मागील आठवड्यात राज्यशासनाने शहरातील 8 वी ते 12 चे वर्ग करोना प्रतिबंधात्मक नियम तसेच पालकांचे संमतीपत्रक घेऊन शाळा सुरू करण्याचे आदेश दिले होते. तसेच शाळा सुरू करायचे की नाही याचा निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनावर सोपवला होता. शहरातील कोरोनाच्या रुग्णांची घटती संख्या आणि मृत्यूचे घटते प्रमाण लक्षात घेता पुणे महापालिकेच्या वतीने आज शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
