मनसे सोबतच्या युतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार – चंद्रकांत पाटील
पुणे: भाजप मनसे युतीची काही दिवसापूर्वी राजकीय वर्तुळात चर्चा होती. पण दोन दिवसां पूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यक्रत्यांना युती बाबत चर्चा करू नका निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश दिले होते. मनसेसोबत युतीबाबत भाजपने अद्याप पक्ष पातळीवर केला नाही.यासंदर्भात राज्य पातळीवरचे आमचे नेते निर्णय घेतील. असे विधान प्रवीण दरेकर यांनी केली होते. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले कितीही चर्चा झाली तरी हा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार. अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
पाटील म्हणाले, महानगरपालिकेच्या निवडणुकीत राज्य सरकारने तीन प्रभाग रचना हा नवा आदेश काढला आहे .त्या वर मंत्री मंडळाच्या बैठकीत आम्ही बसून या तीन सदस्य प्रभाग रचने वर फेरविचार करू असे सांगितले होते.
दोन दिवसा पूर्वी त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीचा भाजपला फायदा होईल असे विधान विरोधी पक्ष नेते व भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी पुण्यात विधान केले होते.अजित पवार म्हणाले, काहीही फरक पडत नाही .आख्या महाराष्ट्रात तीनच वॉर्ड असणार कितीही वॉर्ड असू देत असे अजित पवारानी काल विधान केले होते. त्या वर आज तीनची प्रभाग रचना असेल तरी पुण्यात 8 विधानसभा सभा मतदार संघ त्यामुळे कोविड काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोण कोणती कामे केली हे जनतेला माहीत आहे .त्यामुळे भाजपला काही नुकसान होणार नाही . असे बोलून त्यांनी अजित पवारांना टीकेला आव्हान दिले.
महाविकास आघाडी सरकार जास्त दिवस टिकणार नाही असे भाजपचे नेते भरपूर दिवस झाले म्हणत आहे त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले मध्यवर्ती निवडणुका लवकरच लागतील .असे पाटील म्हणाले.
काँग्रेस-राष्ट्रवादी ची राज्यात सत्ता आहे. द काँग्रेस-राष्ट्रवादी जिल्हा परिषद महानगरपालिका निवडणुकीमध्ये एकत्र लढल्या तर भाजपला निवडणूक फार अवघड होऊन जाईल असे काही महाविकास आघाडी सरकार मधले नेते म्हणत होते त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले. काल बाळासाहेब थोरात यांनी स्वबळावर निवडणुका लढण्याचा नारा दिला आहे. तिकडे नाना पटोले सात – आठ दिवस अख्खा महाराष्ट्रभर फिरत आहेत.स्वबळावर लढलो तर आपण निवडून येऊ का? काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकदा समोर बसून आघाडी करायची की नाही हे ठरवावे असा सल्ला त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला दिला.
