Sunday, June 21, 2026
BusinessLatest NewsLIFESTYLE

सर्वांगीण आरोग्याच्या बांधणीवर भरः टेटली ग्रीन टी इम्युनमधून अंतर्गत आरोग्यावर लक्ष

 फिट दिसण्याची गरज अनेक लोकांना जाणवू लागली असल्याने आरोग्य आणि प्रकृतीवरील ग्राहकांचे लक्ष अधिकाधिक वाढू लागले आहे. परंतु बाहेरून फिट दिसण्याबाबत लोक प्रयत्न करत असताना ते आपल्या आतील आरोग्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. जग न्यू नॉर्मलमध्ये स्थिर होत असताना आता अंतर्गत आरोग्य आणि कल्याणाबाबतची चर्चा मध्यवर्ती आणण्याची वेळ आली आहे. टेटली ग्रीन टी इम्युन अभिनेत्री आणि फिटनेस चाहती मलाइका अरोरा, अभिनेत्री व ख्यातनाम लेखिका दृष्टी धामी आणि पोषणतज्ञ कविता देवगण आणि पॅकेज्ड बेव्हरेजेस (भारत आणि दक्षिण आशिया) टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्सचे अध्यक्ष  पुनित दास यांनी आणला असून #लगोबाहरसेफिटऔरअंदरसेभी याबाबत व्हर्चुअल चर्चा घडवून आणण्यासाठी आणला आहे.

टेटली ग्रीन टी इम्युन हा वेलनेस विभागातील टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्सच्या महत्त्वाच्या नवसंशोधनांपैकी एक असून त्यांनी ग्राहकांच्या गरजांनुरूप सातत्याने बदल केले आहेत. ग्रीन टी हे मुख्यत्वे गरम पेय आहे, जे बाहेरून व्यक्तीला आपला आकार चांगला राखण्यासाठी व फिटनेससाठी असल्याचे मानले जाते. टेटली ग्रीन टी इम्युनमध्ये ग्रीन टीची उत्तमता आणि व्हिटॅमिन सी देखील आहे. त्याचा फायदा प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी होऊ शकतो.

टेटली ग्रीन टी इम्युन अंतर्गत आरोग्यावर भर देते. त्यांच्या नवीन उत्पादनांमध्ये अँटी ऑक्सिडंट्स आहेत. ती शरीर आतून स्वच्छ करण्यास मदत करतात. त्याचबरोबर अतिरिक्त व्हिटॅमिन सीदेखील त्यात आहे, ज्याचा उपयोग शरीराच्या प्रतिकारशक्तीला मदत करण्यासाठी होतो. नेहमीच्या सर्वसाधारण ग्रीन टी खेरीज टेटली ग्रीन इम्युन हे लेमन अँड हनी, जिंजर, मिंट अँड लेमन या चवींमध्ये उपलब्ध आहे आणि ते मँगो फ्लेवरसोबत नॅचरली स्वीटमध्येही उपलब्ध आहे.

चर्चासत्राबाबत बोलताना मलायका अरोरा म्हणाल्या की, “माझ्यासाठी अंतर्गत फिटनेसला बाह्य फिटनेसपेक्षा जास्त महत्त्व आहे. सुदृढ शरीराच्या दिशेने टाकलेले एक पाऊल हे कायमच एका वेळी एक असते. मी कायम लोकांना सकस आहार निवडण्याचे आणि तुमच्या रोजच्या आहाराचा भाग म्हणून तुम्ही जे काही खात आहात त्याकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन करते. टेटली ग्रीन टी इम्युन हे शूटिंग किंवा माझ्या मीटिंग्सला जात असताना पिण्याचे माझे पेय आहे. त्यामुळे माझे शरीर टॉक्सिन्स काढून टाकते आणि आता त्यात अतिरिक्त व्हिटॅमिन सी असल्यामुळे आता आतूनही फिट वाटण्यासाठी ते उत्तम ठरू शकेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading