Wednesday, November 18, 2026
Latest NewsPUNE

पराग बदिरके, अक्षदा इनामदार, जान्हवी गद्रे, पायल रायकर यंदाच्या जाधवर करंडकाचे विजेते

पुणे : पराग बदिरके, अक्षदा इनामदार, जान्हवी गद्रे (पुणे) आणि पायल रायकर (आष्टी) हे यंदाच्या प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर करंडक राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन स्पर्धेचे विजेते ठरले आहेत. अनुक्रमे वत्कृत्व, पोवाडा, भजन, भारुड या प्रकारांत त्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि कै. उद्धवराव तुळशीराम जाधवर फाउंडेशन संचलित प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

वक्तृत्व, पोवाडा, भजन, भारूड या चार प्रकारांमध्ये ही स्पर्धा झाली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर, पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.एन.एस.उमराणी, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, एनएसएसचे प्रमुख डॉ.देसाई, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर यांनी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले आहे. स्पर्धेचे प्रमुख परीक्षक म्हणून शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे यांनी काम पाहिले.

वत्कृत्व स्पर्धेत पराग बदिरके (पुणे) याने प्रथम, अमोल विटनोर (श्रीरामपूर) द्वितीय, गणेश सावकार (नाशिक) तृतीय आणि आशुतोष निकम (सातारा), मयुरी धुमाळ (जातेगाव), भक्ती पवार (आकुर्डी) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे. पोवाडा स्पर्धेत अक्षदा इनामदार (पुणे) हिने प्रथम, माधवी माळी (सांगली) द्वितीय, अनुजा जोशी (पुणे) तृतीय यांसह अविष्कार देशिंगे (कवठे महंकाळ), धनजी जोशी (भुसावळ), किरण मते (इगतपुरी) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला.

भजन स्पर्धेत जान्हवी गद्रे (पुणे) हिने प्रथम, श्रद्धा गद्रे (पुणे) द्वितीय, संध्या कोटकर (संगमनेर) तृतीय आणि दर्शन गुजराथी (भुसावळ), ममता डोपेवाड (निगडी), आकांक्षा कुलकर्णी (नांदेड) यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले. तसेच, भारुड स्पर्धेत पायल रायकर (आष्टी) हिने प्रथम, धनश्री जोशी (भुसावळ) द्वितीय, वरद सोनवणे (ओझर) तृतीय यांसह साक्षी हेब्बाळकर (इस्लामपूर), अश्लेषा मुंगी (बारामती), अपूर्वा जगताप (पिंपरी) यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले. तब्बल ७५ हजारांची पारितोषिके आणि विजेत्या स्पर्धकांना चषक देण्यात येणार आहेत. प्रत्येक विषयातील विजेत्या प्रथम क्रमांकास रुपये ८ हजार व चषक, द्वितीय क्रमांकास रुपये ४ हजार व चषक तृतीय क्रमांकास रुपये ३ हजार व चषक तसेच ३ उत्तेजनार्थ स्पर्धकास प्रत्येकी १ हजार रुपये व चषक देण्यात येईल.

Leave a Reply