शरद पवार यांची सारथीच्या बैठकीला अचानक हजेरी
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अचानक विधान भवन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या सारथीच्या बैठकीला हजेरी लावली आहे. अचानक दिलेल्या या भेतीमुळे उपस्थितांमध्ये एकच चर्चा सुरू झाली. या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकर, संचालक मधुकर कोकाटे, व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे आदी उपस्थित होते.
पुण्यामध्ये उभारण्यात येणाऱ्या सारथीच्या इमारतीची माहिती शरद पवार यांनी घेतली. शासनाने सारथी संस्थेला शिवाजीनगर, भांबुर्डा येथील गट क्रमांक 1737 /1 मधील 4163 चौ.मी शासकीय जागा कार्यालय बांधण्यासाठी प्रदान केली आहे. यामुळे आता सारथी संस्थेला हक्काची जागा उपलब्ध झाली आहे. याठिकाणी उभारण्यात येणाऱ्या इमारतीचे सादरीकरण शरद पवारांना दाखवण्यात आले.
