Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

व्यसनमुक्ती व शाकाहार ही सुखी जीवनाची गुरुकिल्ली – डॉ. कल्याण गंगवाल

पुणे : इतरांना शिकविण्यापूर्वी आपण चांगल्या गोष्टींना स्वत:हून सुरुवात केली पाहिजे. उत्तम आरोग्याकरीता योग देखील करायला हवा. आहारात शाकाहाराचा अवलंब केल्यास आरोग्य उत्तम राहिल. त्यामुळे व्यसनमुक्ती व शाकाहार ही सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे, असे मत डॉ.कल्याण गंगवाल यांनी व्यक्त केले.

आधार सोशल फाऊंडेशन व उत्कर्ष महिला मंडळातर्फे विनामूल्य नेत्र चिकित्सा व चष्मे वाटप शिबीराचे आयोजन शुक्रवार पेठेतील ज्ञानेश्वर मंगल कार्यालयात करण्यात आले. यावेळी मराठी भाषिक बांधकाम व्यवसाय संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ दादा घाटे, सामाजिक कार्यकर्ते ललित कुमार जैन, माजी नगरसेवक धनंजय जाधव, पुणे शहर भारतीय जनता युवा मोर्चा सरचिटणीस राजू परदेशी, लायन्स क्लब इकोफ्रेंडचे प्रमोद उमरदंड, उपक्रमाचे आयोजक फाऊंडेशनचे अध्यक्ष व माजी नगरसेवक दिलीप काळोखे, मंडळाच्या अध्यक्षा सविता काळोखे आदी उपस्थित होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने हा उपक्रम राबविण्यात आला.

ए.एस.जी.आय हॉस्पिटलच्या सहकार्याने हे शिबीर आयोजित करण्यात आले. शिबीरात ३७५ नागरिकांची तपासणी करुन त्यांना चष्मे वाटप करण्यात आले. अमित कंक, पुरण हुडके, अनिल काळोखे, दत्ता परदेशी, सचिन शुक्ला, मंदार रांजेकर, यशोधन आखाडे, राजेश शिंदे, अनिल पवार, सुनील वालगुडे, चंद्रकांत वाघमारे, संजय देवस्थळी, गणेश येनपुरे, गायत्री येनपुरे, अलका नहार, उल्हास खाटपे, मुकेश राजावत आदींनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला.

डॉ.कल्याण गंगवाल म्हणाले, करुणा, दया, प्रेम हे सर्व धर्मांचे मूळ आहे. आपल्या धर्मात देखील हेच सांगितले आहे. शाकाहाराचा अवलंब प्रत्येकाने करायला हवा. आहारात शाकाहार असेल, तर अहिंसा असते, ती प्रत्येक माणसामध्ये असणे गरजेचे आहे.

दिलीप काळोखे म्हणाले, सेवा व समर्पण भावनेने काम करण्याचा प्रयत्न आम्ही फाऊंडेशनच्या माध्यमातून करीत आहोत. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरीता नेत्रचिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील विविध स्तरातील नागरिकांसाठी असे नानाविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सचिन शुक्ला यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading