पैशाच्या वादावरून पेट्रोल टाकून मित्राला पेटवले, उपचारादरम्यान मृत्यू
पुणे : मित्रांमध्ये सुख – दुःखा पैश्यांची देवांघेवांण नेहमी होत असते. मात्र, दोन मित्रांमध्ये पैशावरून झालेल्या वादत एका मित्राने दुसऱ्या मित्राला पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना संकेत विहार, फुरसुंगी येथे घडली. या घटनेत संतोष दादाराव कागदे (वय 51, रा. आंबेगाव बुद्रुक, पुणे ) यांचा मृत्यू झाला आहे. तर याप्रकरणी पोलिसांनी मनोज मोहन कांदे (वय 28, रा. संकेत विहार, फुरसुंगी, पुणे) याला अटक केली आहे. सदर प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न व खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष आणि मनोज ही दोघे मित्र होते. काही दिवसांपूर्वी आरोपी मनोज याने मेट संतोष यांच्याकडून काही पैसे उधारीवर घेतले होते. याच कारणावरून काल (दि. 30) दोघांमध्ये वाद झाला. यातून आरोपी मनोज याने ‘तुझ्या अंगावर पेट्रोल टाकून जाळूनच टाकतो’, असे म्हणत मनोज याने एका बाटलीत पेट्रोल आणून संतोष याच्या अंगावर टाकून त्याला पेटवून दिले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या संतोष कागदे यांचा काही तासांत उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. हडपसर पोलिस पुढील तपास करीत आहे.
