Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

महागाई, काळेधंदे, गुन्हेगारीच्या विरोधात दलित पँथरचा एल्गार

पुणे : महागाई, काळेधंदे, गुन्हेगारीच्या विरोधात दलित पँथरच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. हातात बॅनर, झेंडे आणि घोषणाबाजी करून जिल्हाधिकारी कार्यालयाचा परीसर दणाणून सोडला. यावेळी मोठ्या प्रमाणात दलित पँथरचे कार्यकर्ते उपस्थित होते.

पुणे शहरातील स्वारगेट मार्केटयार्ड आणि भारती विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढत चाललेली गुन्हेगारी, स्त्री अत्याचार, काळेधंदे, गुन्हेगारीला आळा घालावा म्हणून जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी दलित पँथरचे प्रकाश साळवे पुणे शहराध्यक्ष, विशाल खिलारे पुणे जिल्हाध्यक्ष, विशाल खिलारे, विठ्ठल केदारी, विक्रम कांबळे, राजेश गवळी, राहुल सोनवणे आरती बाराचे आदी उपस्थित होते.

प्रकाश साळवे यावेळी बोलताना म्हणाले की, पुणे शहरातील स्वारगेट मार्केटयार्ड आणि भारती विद्यापीठ परिसरात काळेधंदे, सट्टा, जुगार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी अनघा देशपांडे यांची शासकिय स्तरावर चौकशी होवून त्यांचेवर कठोर कारवाई करावी व स्वारगेट सी.पी. हद्दीत व गार्केटयार्ड हद्दीमध्ये असणारे अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे.

स्वारगेट ए.सी.पी. ऑफिसच्या हद्दीमध्ये शेकडो अवैध बेकायदेशीर धंदे मटका, जुगार , गावठी दारु , हातभट्टीची दारु , चरस , पत्त्याचा क्लब , सोरट , लॉटरी अनेक मसाज पार्लरमध्ये गाजांचे धंदे , पान टपरीवर बेकायदेशीर गुटखा विक्री , स्वारगेट एस.टी. स्टॅन्ड शेजारी रात्री उशीरापर्यंत अंडाभुर्जीच्या बेकायदेशीर हातगाडया सुरु असतात , असंख्य लॉज व इतर अनेक अनाधिकृत धंद्यापासून स्वारगेटच्या ए.सी.पी. सुषमा चव्हाण घालावे. नाहीत तर भविष्यात मोठ्या प्रमाणात दलित पँथरकडून आंदोलने करण्यात येतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading