fbpx
Monday, June 17, 2024
BusinessLatest News

सोन्याचे दर प्रति तोळा ४५ हजारावर येण्याची शक्यता

मुंबई : जूनच्या मध्यापासून आजपर्यंत सोन्याच्या किंमती १६८०-१८४० डॉलरच्या टप्प्यात व्यापार करत आहेत. एंजेल वन लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष प्रथमेश माल्या यांनी सांगितले की, सोन्याच्या बाजारात सध्या अनेक घटक वर्चस्व गाजवीत आहेत. यामध्ये फेडने आपला क्यूई कार्यक्रम बंद करण्यापासून ते कोविड-१९ मुळे अद्यापही जागतिक वित्तीय बाजारापेठांवर होत असलेला परिणाम असा असंख्य घटकांचा समावेश आहे. मात्र, साध्यस्थीतीत मजबूत डॉलर, वाढता आशावाद, अमेरिकेचे वाढते ट्रेझरी यील्ड्स, बाँड खरेदी कार्यक्रम बंद करणे यांसारखे घटक सोन्याच्या किंमतीतील सुधार दर्शवणारे आहेत. सोन्याच्या किंमती एका महिन्याच्या दृष्टीकोनातून प्रती टोळा ४५ हजारांच्या दिशेने जाण्याची आमची अपेक्षा आहे.

सोन्याचे दर कमी करणारे घटक:

सोन्याच्या बाजारात बरेच घटक महत्वपूर्ण ठरतात. डॉलरपासून सुरुवात केल्यास निर्देशांका अलीकडच्या आठवड्यात (९३.६०) वर एक महिन्याच्या उच्चांकावर पोहोचला, तर बेंचमार्क यूएस10 वर्षांच्या ट्रेझरी यील्ड्सने तीन महिन्यांतील सर्वोच्च (१.४८%) पातळी गाठली. यामुळे व्याजरहित सोने चांदी धरुन ठेवण्याची संधी वाढली आहे. शिवाय अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेच्या अधिका-यांनी फेडच्या मासिक रोखे खरेदीत कपात करून नोकऱ्यांमधील वाढ कायम ठेवली आहे, सप्टेंबरच्या रोजगार अहवालात आता मध्यवर्ती बँकेच्या बाँडसाठी ‘निमुळती’ संभाव्य धडक बसणार आहे. फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी असेही म्हटले आहे की, सप्टेंबरपर्यंत अमेरिकेच्या नोकऱ्यांची वाढ मजबूत राहिली तर मध्यवर्ती बँक नोव्हेंबरच्या धोरणात्मक बैठकीनंतर आपली मालमत्ता खरेदी मागे घेण्यास सुरुवात करू शकते.

सोन्याच्या किंमतींमधील मंदीचे संकेत 

अलीकडच्या आठवड्यात सीएफटीसीच्या स्थितीवरून असे दिसून येते की, हेज फंड आणि मनी मॅनेजर्स पिवळ्या धातूतील त्यांची जोखीम कमी करीत आहेत. १ ऑगस्ट २०२१ रोजी पर्यंत नेट लॉन्ग १,०६,६६२ करार होते जे २१ सप्टेंबर २०२१ रोजी नेट लॉन्गमध्ये घटहोत २१९५४ करारांवर राहिले पुढील आठवड्यात सोन्याच्या किंमतींमधील मंदीचे हे स्पष्ट संकेत आहे.

सोन्याच्या किंमती १७४०/० झेड डॉलर्सच्या ब्रेकवर आयत रचना मोडणार आहेत. ही पातळी तुटल्यामुळे १६८० डॉलर्सच्या दिशेने आणखी सुधारणा होऊ शकते, जी सध्याच्या १७४०० डॉलर्सच्या पातळीपेक्षा सुमारे ८० डॉलर्सच्या नकारात्मक बाजूवर आहे. एमसीएक्सवर याचा अर्थ २० सप्टेंबर २०२१ पर्यंत सध्याच्या ४६००० रुपयांच्या पातळीपासून सुमारे १२०० रुपये आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading