Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

कर्तव्य सामाजिक संस्थेचे वतीने १५००० पुणेकरांसाठी मोफत लसीकरणाचा उपक्रम

पुणे : २३ मार्चला संपूर्ण देशात लाॅकडाऊन लागले तेव्हा पुणे शहरात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती इतर शहरांपेक्षा पुणे मुंबई शहरात रुग्णांची संख्या जास्त दिसून येते होती कोविडसारख्या महामारी काळात लोकांना जनजागृती करुन त्यांच्या विषयी माहिती देण्यापासून अगदी हाॅस्पिटलला बेड उपलब्ध करून देणे ऑक्सिजन/व्हेंटिलेटर बेड रेमीडिसिव्हर इंजेकशन उपलब्ध करून देणे यासाठी कर्तव्य सामाजिक संस्थेमार्फत अनेक गरजू लोकांना मदत करण्यात आली.

सौरभ आमराळे

आसपासच्या खेडेगावातून देखील लोक सहकार्य आणि मदतीसाठी शहरात येत होते त्यावेळी मानसिक आधार देण्यापासून ते शक्य होईल ती मदत करण्यापर्यंत सहकार्य केले लसीकरण करण्यास सुरुवात झाली सुरवातीला लसीकरण संदर्भात अनेक शंका आणि लोकांचें विविध प्रश्न होते लस उपलब्ध होत नव्हती त्यावेळी स्लाॅट बुकिंग होत नव्हते आणि मोफत लसीकरण करून देणे ह्या सुविधा जनसंपर्क कार्यालयातून करण्यात आली बाजूलाच असलेल्या स्व. मालती कांची प्रसूतीगृह (गाडीखाना हाॅस्पिटल) येथे मोफत लसीकरण करून देण्यासाठी लोकांना सहकार्य करण्यात आले.

कर्तव्य सामाजिक संस्थेमार्फत संपूर्ण पुणे शहर आणि प्रभागातून १५००० लोकांचे मोफत लसीकरण करून देण्यात आले सोबतच त्यांना नोंदणी करून देणे,लस घेतल्याची मोफत प्रिंट करून त्याचे सर्टिफिकेट देणे तसेच स्लाॅट बुकिंग करून देणे भागातील खूप अशा गरीब लोकांना मोफत लसीकरण करून देण्यात आले कित्येकांना मोबाईल देखील हाताळता येत नाही अशा प्रसंगी स्वतःच्या नावावर बुकिंग करून देण्यात आले सदर हा मोफत लसीकरणाचा उपक्रम कर्तव्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि पुणे शहर युवक काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. सौरभ अमराळे यांनी पुणेकरांसाठी राबविला

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading