Wednesday, November 18, 2026
Latest NewsPUNE

पुणे शहरामध्ये  गेल्या 24 तासात  कोरोनाचे नवीन 155 रुग्ण  तर 138 रुग्णांना डिस्चार्ज

पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची कमी  असून दोनशे च्या खाली आज  रुग्ण सापडले  आहेत. पुणे शहरामध्ये  गेल्या 24 तासात 155नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 138रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 5लाख 11हजार  081इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4लाख 90हजार 648इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 6रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 4तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 2रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9031जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 1502रुग्ण अ‍ॅक्टिव्ह  आहेत. त्यापैकी 185रुग्ण गंभीर आहेत आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 8419 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply