परमबीर सिंह यांना परदेशात पळून जाण्यासाठी भाजपने मदत केली – नाना पटोले
नाना पटोले म्हणाले, परमबीर सिंह यांना परदेशात पळून जाण्यात भाजपनेच मदत केली आहे. परमबीर यांच्या बाबत गृहविभागाला मिळालेल्या माहितीनुसार त्यांचे शेवटचं लोकेशन गुजरातच्या अहमदाबादमध्ये होतं. अहमदाबादमधूनच त्यांनी केंद्रातल्या भाजप नेत्यांना संपर्क साधला होता. त्यामुळे त्यांना पळून जाण्यासाठी भाजपने मदत केल्याचे उघड आहे. उद्या परमबीर सापडले तर अनेक गोष्टींचा खुलासा होईल.
दरम्यान, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणार्या चांदीवाल आयोगारमोर सातत्यानं गैरहजर राहणार्या परमबीर सिंह यांच्याविरोधीत अखेर चांदिवाल आयोगानं वॉरंट जारी करण्याचे निर्देश दिले होते. वारंवार निर्देश देऊनही परमबीर सिंह आयोगापुढे हजर न रहील्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र परमबीर हे एक जेष्ठ आयपीएस अधिकारी असल्यानं त्यांना अखेरची संधी देत आयोगानं 6 ऑक्टोबरच्या सुनावणीत मुंबईत आयोगासमोर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
