Friday, May 29, 2026
BusinessLatest News

गोखले कन्स्ट्रक्शन्सचा नवरात्रातील यंदाचा गृह-महोत्सव ग्राहकांना ठरणार अधिक लाभदायक

पुणे : शहरातील मोक्याच्या जागी निवासी व व्यावसायिक प्रकल्पांची निर्मिती तसेच जुन्या इमारतींचा पुनर्विकास या क्षेत्रात नावलौकिक असलेल्या गोखले कन्स्ट्रक्शन्सचा नवरात्रातील गृह महोत्सव यंदा ग्राहकांना अधिक लाभदायक ठरणार असल्याची माहिती गोखले कन्स्ट्रक्शन्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विशाल गोखले यांनी दिली.

याविषयी अधिक माहिती देताना विशाल गोखले म्हणाले “गेली सलग आठ वर्षे आंम्ही सदर गृहमहोत्सवाचे आयोजन करीत आहोत. उत्तम दर्ज्याचे बांधकाम, वेळेत ताबा आणि मोक्याचे ठिकाण आदी वैशिष्ट्यांबरोबरच मोठ्या प्रमाणात अतिशय लाभदायक अशा सवलती मिळत असल्याने दरवर्षी ग्राहकांचा महोत्सवास उदंड प्रतिसाद लाभतो. महोत्सवाचे सलग ९ व्या वर्षात पदार्पणा होत असल्याचे औचित्य साधत ग्राहकांसाठी अत्यंत फायदेशीर अशा काही विशेष योजना यंदा सादर केल्या जातील. यामध्ये निवासी जागांबरोबरच व्यावसायिक जागांचा मोठ्या प्रमाणात समावेश असेल”.

सिटी प्राईड – कोथरूड समोर सकारात असलेल्या ‘गोखले बिझनेस बे’ या भव्य व्यापारी संकुलात ऑफिस (व्यावसायिक वापराच्या जागा) केवळ रुपये ९९९९ प्रती चौरस फुट इतक्या अभुतपुर्व किमतीत विकत घेण्याची नामी संधी महोत्सवादरम्यान ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. सध्याच्या बाजार भावानुसार येथील व्यावसायिक जागा खरेदी करण्याचा दर हा अंदाजे रुपये १६००० प्रती चौरस फुट इतका आहे.  त्यामुळे व्यावसायिक जागा घेवू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी ही खऱ्या अर्थाने सुवर्ण संधी ठरेल, असे मत गोखले यांनी व्यक्त केले.

सुमारे ११ लाख चौरस फुट इतक्या विस्तीर्ण जागेत आकार घेत असलेल्या व अत्याधुनिक सोयी सुविधा असलेल्या ‘गोखले बिझनेस बे’ या कोथरूड येथील व्यापारी संकुलाचे बांधकाम अत्यंत वेगाने सुरु असून येत्या काही महिन्यातच तेथे लाईफ स्टाइल, वेस्ट साईड आणि पु. ना. गाडगीळ अँड सन्स यासारख्या प्रथितयश व्यवसायांच्या भव्य दालनांची / कार्यालयांची अंतर्गत रचना (interior) करण्याचे काम सुरु होणार आहे.

याबरोबरच पुणे शहरातील ९ अत्यंत मोक्याच्या ठिकाणी साकारणाऱ्या निवासी गृहप्रकल्पांमध्ये महोत्सवादरम्यान सदनिका खरेदी केल्यास त्यावर तेथे असलेल्या बाजार भावावर थेट रुपये ९९९ प्रती चौरस फुट इतकी सवलत मिळेल. ही सवलत काही विशेष योजने अंतर्गत दुप्पट करून घेण्याची संधी देखील ग्राहकांना असेल असे गोखले यांनी आवर्जून नमूद केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading