Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास काँग्रेस आणि स्थानिकांचा हंडा मोर्चा – रास्ता रोकोचा इशारा..

सातत्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याच्या पार्श्वभूमीवर मुख्य अभियंत्यांना निवेदन

पुणे : सतप्पा पडवळ पथ, नवी पेठ व यशवंतनगर सोसायटी नवी पेठ या ठिकाणी गेल्या ३ ते ४ महिन्यांपासून जाणून बुजून कमी दाबाने पाणी पुरवठा केला जात आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाचे उपभियंता तसेच मुख्य अभियंता यांना अनेक वेळा तक्रारी देऊनसुद्धा मुद्दामहून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. येणाऱ्या ४ दिवसांत महानगरपालिका प्रभाग क्र 29 या ठिकाणाचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला नाही तर या भागातील महिला भगिनींना हंडा-कळशी घेऊन रास्ता रोको करणार असल्याचे निवेदन यावेळी पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांना दिले.

पुणे परिसरातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असून सुद्धा येथील स्थानिक नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. कमी दाबाने येणा-या पाण्यामुळे स्थानिकांच्या संतापाचा उद्रेक होत असून आगामी काळात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास या भागातील महिला भगिनींना हंडा-कळशी घेऊन रास्ता रोको करणार असल्याचे कॉंग्रेसचे पदाधिकारी व पीएमटीचे माजी अध्यक्ष सुधीर काळे यांनी सांगितले आहे.

यावेळी सुधीर काळे, यशवंत नगर सोसायटीचे चेअरमन सुभाष मोहोळ, संतोष थरकुडे, दतात्रय मारणे, कपील सावले, विजय घोलप, संदिप खराटे, अजित भोरेकर, सुरज मालुसरे, क्षितीज जैनक, सनी घोडे, अनिकेत गायकवाड, रणजीत काळे, अदित्य बालेघाटे, अमित काळे, अजित तुपेरे, नलिनी दोरगे, पपिता सोनवणे, सोनिया ओव्हाळ हे उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading