तनिष्क सादर करत आहे सणासुदीसाठी खास कलेक्शन – ‘उत्साह’
भारतातील सर्वात आघाडीचा रिटेल ज्वेलरी ब्रँड तनिष्कने सणासुदीसाठी एक खास कलेक्शन दाखल केले आहे – ‘उत्साह’ – जीवनाचा सण! समृद्ध परंपरा आणि आधुनिकतेचा मिलाप, शुद्ध सोन्याचा उपयोग, अभिरुचीसंपन्न आणि कलात्मक समकालीन दागिने ही तनिष्कच्या नव्या कलेक्शनची वैशिष्ट्ये आहेत.
प्लेन आणि ऑर्नेट सोन्यामध्ये अतिशय नजाकतीने घडवण्यात आलेली नाजूक नक्षीदार डिझाइन्सचे हे कलेक्शन समृद्ध भारतीय परंपरेला अनोख्या आधुनिक दागिन्यांच्या रूपात पुनःकल्पित करत एथनो-कन्टेम्पररी दर्शवते. हे कलेक्शन खास अशा महिलांसाठी तयार करण्यात आले आहे ज्यांना आधुनिकता, तीक्ष्ण बुद्धी आवडते आणि ज्या डिझाइन्सच्या बाबतीत जाणकार व चोखंदळ आहेत.
उत्साह कलेक्शनमध्ये नाविन्यपूर्ण स्टायलिंगसह पुन्हा नव्या संकल्पनांसह सादर करण्यात आलेले सिल्हट्स आणि भौमितिक स्वरूपांमध्ये पारंपरिक रूपांकनांना आधुनिक करण्यावर भर देण्याबरोबरीनेच अतिशय अचूक कन्टेम्पररी ट्रीटमेंट्स प्रस्तुत केल्या गेल्या आहेत. हे प्रभावी आणि आधुनिक कलेक्शन मॉडर्न फिलिग्री, स्टॅम्प आणि वायर वर्क, इनेमल, जाळी ओव्हर स्टोन, टिकली, रावा आणि बॉल वर्क सारख्या कारीगरी तंत्रांच्या वापराला प्रोत्साहन देते. सोन्याची चमक आणि वेगवेगळ्या पॅटर्न्स यांना एकत्र आणणारे हे कलेक्शन खरोखरीच अनोखे आहे.
या वर्षीच्या सणासुदीच्या काळातील ज्वेलरी ट्रेंड्सना आधीच जोखून आणि त्यांना डोळ्यासमोर ठेवून तनिष्कने शानदार लूकसाठी आकर्षक नेकलेसेसच्या लेयरिंगच्या सौंदर्यावर लक्ष केंद्रित केले. हे या कलेक्शनच्या सर्वात प्रमुख वैशिष्ट्यांपैकी एक आहे. तनिष्कचे ‘उत्साह‘ कलेक्शन नजाकत, वारसा आणि आधुनिक संवेदनशीलतांसह समकालीन केल्या गेलेल्या पारंपरिक डिझाइन्सचा परिपूर्ण मिलाप आहे जो पारंपरिक कारीगरीला नवे जीवन प्रदान करतो. हे अशा प्रकारचे अतिशय अनोखे मॉडर्न-हेरिटेज ज्वेलरी कलेक्शन आहे जे भारतीय वारसा कलांच्या पॅटर्सनी प्रेरित होऊन तयार करण्यात आले आहे. यंदा दिवाळीत कोणत्याही महिलेचा लुक परिपूर्ण बनवण्यासाठी शानदार अँसिलरी म्हणून हे कलेक्शन परफेक्ट ठरेल.
टायटन कंपनी लिमिटेडच्या चीफ डिझाईन ऑफिसर श्रीमती रेवती कांत यांनी फेस्टिव्ह कलेक्शनच्या शुभारंभ प्रसंगी सांगितले, “दरवर्षीप्रमाणे आणि खासकरून दिवाळीसाठी तनिष्क तुमच्यासाठी सादर करत आहे अतिशय सुंदर पद्धतीने डिझाईन केलेले आणि आमच्या निपुण कारीगरांनी खूपच प्रेमाने घडवलेले शानदार दागिने जे तुमचा दिवाळीचा आनंद अधिक सोनेरी करतील. आमचे हे नवे दिवाळी कलेक्शन ‘ उत्साह’ वेअरेबिलिटीचा पैलू डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आले आहे,
