Friday, May 29, 2026
ENTERTAINMENTLatest News

मराठी गाण्याचा विक्रम : ‘येड्यावानी करतंय’ गाण्याच्या टिमला करावी लागली चित्रीकरणादरम्यान पावसामध्ये येड्यावानी नॉनस्टॉप 36 तास मेहनत

गाण्यामध्ये रोमॅन्स फुलवायचं काम करणारा पाऊस त्याचं गाण्याच्या शुटिंगच्या टिमला मात्र किती त्रासदायक ठरू शकतो, त्याचं उत्तम उदाहरण ठरलं, नादखुळा म्युझिकचं ‘येड्यावानी करतंय’  हे नुकतंच रिलीज झालेलं गाणं. नादखुळा म्युझिक प्रस्तुत ‘येड्यावानी करतंय’ हे गावरान बाजाचं रोमँटिक गाणं नुकतंच रिलीज झालंय.

निखील नमीत आणि प्रशांत नाकतीची निर्मिती असलेलं, अभिजीत दानी दिग्दर्शित, संजु राठोड आणि जी स्पार्क ह्यांनी संगीतबध्द केलेलं, संजु राठोड आणि सोनाली सोनावणेने गायलेलं ‘येड्यावानी करतंय’ हे गाणं श्रध्दा पवार आणि नील चव्हाणवर चित्रीत झालंय. ह्या गाण्याचं चित्रीकरण इगतपुरी जवळच्या एका गावात केलंय. पहिल्या प्रेमावरचं गावरान गाणं असल्याने हिरव्याकंच शेतामध्ये पावसाळ्यात हे गाणं चित्रीत करायचं ठरलं, पण पावसानेच शुटिंगमध्ये खोळंबा केला. आणि 36 तास ब्रेक न घेता टिमला हे गाणं शुट करावं लागलं.

ह्याविषयी दिग्दर्शक अभिजीत दानी म्हणतात,”नवोदित कलाकारांची टिम असल्याने रिटेक झाले तर, असं म्हणून शुटिंग वेळेत पूर्ण करण्यासाठी सकाळी चारची शिफ्ट लावली. पण जणु पावसाने आमची परिक्षाच घ्यायचं ठरवलं होतं. पावसाने त्यादिवशी उसंतच घेतली नाही. मग उघड्या रानात शुटिंग पूर्ण करताना आमचे नाकीनऊ आले. अख्खा दिवस अख्खी रात्र जागून आणि दुस-या दिवशीही असं करून 36 तासात गाणं पूर्ण केलं. ह्यात आमच्या युवा कलाकारांचा जोश कामी आला. आणि आता ही येड्यावानी केलेली मेहनत फळाला आलेली आहे.”

निर्माते निखील नमीत आणि प्रशांत नाकती म्हणतात, “नादखुळा म्युझिक सुरू करताना नव्या टॅलेंटला व्यासपीठ देण्याचा आमचा संकल्प होता. संजू राठोड ह्या जळगावच्या टॅलेंटेड संगीतकार, गायकाला आम्ही ह्या गाण्यातून संधी दिलीय. अशाच नवनव्या कलाकारांना आपली क्षमता सिध्द करायची संधी नादखुळा म्युझिक सातत्याने देत राहिल.”

संजु राठोडने गाण्याचे बोल लिहीले आहेत. संगीत दिले आणि हे गाणे गायलेही आहे. गीतकार, संगीतकार, गायक संजु राठोड म्हणतो, “माझी आत्तापर्यंतची सर्व गाणी ही शहरी बाजाची होती. गावरान बाजाचं एखादं गाणं करावं अशी इच्छा होती. आणि हे बोल सुचले. गाणं तयार झाल्यावर एकदा प्रशांतदादाला  ऐकवलं. त्याला ते एवढं आवडलं की, प्रशांतदादा आणि निखीलदादाने लगेच निर्मिती करायचं ठरवलं.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading