मोफत मूळव्याध शिबिराचा जागतिक विक्रम
हेम्प स्ट्रीट, निरोग स्ट्रीट, दिल्ली, आयुर्वेद प्रोक्टोलॉजी असोसिएशन, चंद्रा नर्सिंग होम यांचे शिबिराला प्रमुख सहकार्य मिळाले. डॉ. सीमा पाटोळे, डॉ.पूजा कोहली, डॉ. देव यादव, डॉ. गौरव शर्मा, डॉ. सार्थक पवार, डॉ. महेश संघवी, डॉ. विनय अकुला यांनी शिबिराला सहकार्य केले. मूळव्याधाविषयी जागृती होऊन रुग्णांनी त्यावर उपचार घेऊन निरोगी जीवन जगावे हा उद्देशाने मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ.कुणाल कामठे म्हणाले, मूळव्याध हा आजार अतिशय सर्वसामान्य झाला आहे. प्रत्येक व्यक्तीस आयुष्यात एकदातरी मूळव्याधीचा त्रास होत असतो आणि त्यातील २० ते २५ टक्के लोकांना उपचारांची गरज पडते. मूळव्याध हा आजार अयोग्य जीवनशैलीमुळे होणारा आजार आहे. बऱ्याचदा अनेक पथ्यापथ्ये करूनदेखील हा आजार होतो. सर्वसामान्यांमध्ये या आजाराविषयी अनेक गैरसमज आहेत जनजागृतीदेखील कमी आहे याच उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
