Wednesday, November 18, 2026
Latest NewsPUNE

प्रभात मित्र मंडळच्यावतीने ९३४ जणांचे मोफत लसीकरण

पुणे : प्रभात मित्र मंडळ आणि बाळासाहेब देवरस पॉलिक्लिनिक यांच्यावतीने एकदिवसीय मोफत लसीकरण अभियान राबविण्यात आले. गुरुवार पेठ  पूर्व भागातील  ९३४ जणांचे लसीकरण यावेळी झाले. स्वरूपवर्धिनी व सह्याद्री रूग्णालय यांचे सहकार्य यावेळी मिळाले.
गुरुवार पेठेतील नाकोडा भैरव जैन धर्मशाळा येथे लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते.
किशोर चव्हाण म्हणाले, कोविड महामारीवर आळा घालण्यासाठी लसीकरण हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळे अधिकाधिक व्यक्तींचे लसीकरण व्हावे  व कोणतीही व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहू नये या उद्देशाने लसीकरण अभियान राबविण्यात आले. शहराच्या पूर्व भागातील अल्प उत्पन्न धारकांसाठी हे शिबिर राबविण्यात आले.

Leave a Reply