एसबीआय जनरल इन्शुरन्सकडून आरोग्य उपक्रम #7MinutesToGoodHealth लाँच
मुंबई : एसबीआय जनरल या भारताच्या आघाडीच्या जनरल इन्शुरन्स कंपनीने वैशिष्ट्यपूर्ण आरोग्य उपक्रम ‘७ मिनिट्स टू गूड हेल्थ’ लाँच केला आहे. या सुलभ व प्रभावी मार्गदर्शनपर उपक्रमाच्या माध्यमातून कंपनी आरोग्याप्रती कटिबद्धता मोठ्या प्रमाणात दृढ करत आहे.
एसबीआय जनरलने नेहमीच आरोग्यावर लक्ष केंद्रित करत त्याला अधिक प्राधान्य दिले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून एसबीआय जनरल लोकांना दररोज ७ मिनिटे योग्य श्वासोच्छ्वास घेण्याच्या तंत्रांचा सराव करण्यास प्रोत्साहित करते, ज्यामुळे त्यांना त्यांचे शरीर व मन यामध्ये बदल घडवून आणण्यास मदत होईल.
या उपक्रमासह एसबीआय जनरल अभिनेत्री व योगाप्रेमी विद्या मालवदे सोबत नवीन ब्रॅण्ड सहयोग देखील करत आहे. ती या आरोग्य उपक्रमाची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर असेल आणि सोशल मीडिया व्यासपीठांवरील मार्गदर्शनपर व्हिडिओ व अनेक लाइव्ह सत्रांच्या माध्यमातून श्वासोच्छ्वास करण्याच्या योग्य तंत्रांना दाखवेल. एसबीआय जनरल इन्शुरन्सने या मार्गदर्शनपर आरोग्य उपक्रमासाठी जगातील योगाचे सर्वात जुने केंद्र दि योगा इन्स्टिट्यूटसोबत सहयोग केला आहे. एसबीआय जनरलचा हा देशव्यापी आरोग्यविषयक जागरूकता उपक्रम आहे.
एसबीआय जनरल इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पीसी कंदपालम्हणाले, ”सद्यस्थितीमध्ये आरोग्य उत्तम असणे हे पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाचे बनले आहे. याच कारणामुळे आम्ही हा उपक्रम #7MinutestoGoodHealth ची संकल्पना मांडली. दुसरीकडे, आम्ही आपल्याला गतीशील जीवनामध्ये नियमितपणे व्यायाम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत असो वा नसो दिवसातून फक्त ७ मिनिटे वेळ काढणे अजूनही शक्य आहे, या पूर्वलक्षी दृष्टिकोनाला महत्त्व दिले आहे. #7MinutesToGoodHealth तुम्हाला दिवसातून फक्त ७ मिनिटांमध्ये शरीर व मन यामध्ये परिवर्तन घडवून आणण्यास साह्य करतो.” एसबीआय जनरल इन्शुरन्सचा #7MinutesToGoodHealth सुलभ ७ मिनिटांचा श्वासोच्छ्वास करण्यासंदर्भातील प्रोग्रॅम आहे, ज्यामुळे अनेक आरोग्यविषयक लाभ मिळण्यामध्ये मदत होऊ शकते.
