fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsPUNE

येत्या दोन दिवसांत जिल्ह्यातील घाटमाथ्याच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता

पुणे:येत्या दोन दिवसांत जिल्ह्यातील घाटमाथ्याच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाकडून त्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
वायव्य आणि पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आगामी दोन दिवस घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होऊ शकतो. मंगळवारनंतर पावसाचा जोर कमी होईल, असे हवामान खात्याकडून सांगितले आले आहे.
गुलाब चक्रीवादळाचा मोठा परिणाम आज महाराष्ट्रात जाणविण्याची आहे. विदर्भ मराठवाड्यासह 11 जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढच्या काही दिवसांत परतीचा पाऊस धुमाकूळ करेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पुढचे 4 दिवस राज्यांतल्या विविध भागांत कमी अधिक प्रमामात पावसाची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचं शनिवारी चक्रीवादळात रुपांतर झालं आहे. पाकिस्तानने या चक्रीवादळाचं ‘गुलाब चक्रीवादळ’ असं नामकरण केलं आहे. गुलाब चक्रीवादळ आज ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकू शकतं.

बंगालच्या उपसागरावर शनिवारी कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन तयार झालेले गुलाब चक्रीवादळ हे पूर्व किनारपट्टीकडे सरकत आहे. हे वादळ काल रात्री( 26 सप्टेंबर ) गोपाळपूर आणि कलिंगपट्टणममध्ये धडकलं.

यामुळे पूर्व किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि वाऱ्याचा वेगही वाढण्याची शक्यता आहे. पुढील 3-4 दिवस महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading