Tuesday, June 16, 2026
Latest NewsLIFESTYLE

“फॅशनिस्टां ऑफ द इअर” चा सोहळा दिमाखात संपन्न

ए आर व्हेंचर आयोजित फॅशनिस्टां ऑफ द इअर या सौंदर्यस्पर्धेचा अंतिम सोहळा मर्यादित लोकांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडला . ए आर व्हेंचर ही कंपनी मॉडेलिंग ऍक्टिंग णि गृमिंगशी संदर्भात असून अनुजा राव ह्या संस्थापिका आहेत. या कंपनीचा हा दुसरा शो आहे , त्यांचा पहिला ए आर के सुपरस्टार हा लहान मुलांचा शो देखील यशस्वी झाला होता.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माविम च्या अध्यक्षा ज्योती ठाकरे,जयेश खाडे, जय श्रींगारपूरे, प्रशांत जोशी, स्वरूप मीडियाचे सचिन नारकर, आय लिफ बँकवेट्सचे प्रतिष आंबेकर तसेच फॅशन इंडस्ट्रीशी निगडित अनेक मान्यवर उपस्थित होते. या शोसाठी ब्युटी कॉर्नर हे टायटल स्पॉन्सर्स होते तर ट्रेल अँप व आय लिफ बँकवेट हे असो पार्टनर होते .संपूर्ण महाराष्ट्रातून या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला. यात मिस कॅटेगरीतून श्रेया पगारे, श्रुती कांबळे, आंचल गोवेकर या प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. मिस टिन मधून तनिशा माजी व कस्तुरी महाजन यांनी प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवला.मिसेस कॅटेगरीतून प्रणाली निमजे, दानिशा दास, इंदू हरजाई तर मिस्टर कॅटेगरीतून दानिश राजपूत, वैभव साटम आणि शाश्वत चिलवंत यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेसाठी फॅशन कोरीओग्राफर अवि पायल, फेमिना मिस इंडिया गुजरात 2017 मिस अमरदीप कौर,दालन महाराष्ट्राचे अध्यक्षा पौर्णिमा शिरिस्कर तसेच इनामदार कंपनीच्या श्वेता इनामदार यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading