Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

सर्व विद्यार्थ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा संभाजी ब्रिगेड च्या वतीने ३० सप्टेंबर रोजी तीव्र आंदोलन -चंद्रशेखर घाडगे

पुणे:आरोग्य विभागातील पद भरतीसाठी २६ सप्टेंबर रोजी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. पण हॉल तिकिटात संबंधित एजन्सीने प्रचंड गोंधळ घातल्याचं समोर आलं होतं. हॉल तिकीटमध्ये अनेक चुका समोर आल्या होत्या.संबधीत एजन्सीवर कारवाई करून सर्वच विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान भरपाई भरून द्यावी, कारण विद्यार्थी पाचशे किलोमीटर वर परीक्षा केंद्र असल्या कारणाने एक दिवस आधीच परीक्षा केंद्रावर आले होते, ते सर्वच विद्यार्थी शेतकरी, व सर्वसामान्य कुटुंबातील आहेत, म्हणुन त्या सर्व विद्यार्थ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा संभाजी ब्रिगेड च्या वतीने ३० सप्टेंबर रोजी आरोग्य विभागाच्या कार्यालया बाहेर तीव्र आंदोलन करण्यात येईल.असा जिल्हाध्यक्ष,चंद्रशेखर घाडगे संभाजी ब्रिगेड पुणे यांनी दिला.

 आरोग्य विभागाने निष्क्रिय एजन्सीला परीक्षेची जबाबदारी दिलेली आहे, त्या एजन्सीवर कारवाई करावी तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी परीक्षेच्या तारखेत त्वरित बदल करावा.२६ सप्टेंबर ऐवजी पुढच्या आठवड्यातील तारीख घ्यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड चे पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी केली होती, अखेर राज्य सरकारने ही परीक्षा तुर्तास रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 संबधीत एजन्सीवर कारवाई करून सर्वच विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान भरपाई भरून द्यावी, या संदर्भात जिल्हाधिकारी पुणे व आरोग्य संचालकांना संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने निवेदन देण्यात आले, विद्यार्थी पाचशे किलोमीटर वर परीक्षा केंद्र असल्या कारणाने एक दिवस आधीच परीक्षा केंद्रावर आले होते, ते सर्वच विद्यार्थी शेतकरी, व सर्वसामान्य कुटुंबातील आहेत, म्हणुन त्या सर्व विद्यार्थ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा संभाजी ब्रिगेड च्या वतीने ३० सप्टेंबर रोजी आरोग्य विभागाच्या कार्यालया बाहेर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी दिला, यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष साजिद सय्यद, हवेली तालुकाध्यक्ष शिवाजी पवार, मावळ लोकसभा कार्याध्यक्ष दिनकर केदारी, महिला आघाडी अध्यक्षा मोहिनी रणदिवे, सोशल मिडिया जिल्हा उपाध्यक्ष अशोक फाजगे, कामगार आघाडी संघटक अंकुश हाके, जिल्हा संघटक हनुमंत गुरव, शिरूर लोकसभा कार्याध्यक्ष गणेश बावणे,मावळ तालुका संघटक संतोष सुर्यवंशी, सुनील लोणारे, संध्या माने आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading