महिला अधिकाऱ्याला अपशब्द वापरणाऱ्या आमदार सुनिल कांबळे यांच्या निषेधार्थ महापालिका समोर सर्वपक्षीय आंदोलन
पुणे: भाजपचे पुणे केन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांनी महापालिकेच्या एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला अपशब्द वापरून शिवीगीळ केली.या अपशब्दाच्या निषेधार्थ आज मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेने च्या महिलानी पुणे महापालिका समोर आंदोलन केले.
या आंदोलनाला ,काँग्रेस पुणे शहर जिल्हा सरचिटणीस संगीता तिवारी, मनसेच्या पुणे शहर महिला अध्यक्ष रूपाली ठोंबरे,मनसे च्या कसबा मतदार संघाच्यामहिला व कार्यकत्या शिवसेनेच्या उपस्थित होत्या.
संगीता तिवारी म्हणाल्या,राज्यात कोणत्याही महिले वर बलात्कार झाला तर भाजप हा आमच्या सरकारवर टीका करत असतो.पण 2 दिवसा पूर्वी आमदार सुनील कांबळे यांनी एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला अपशब्द वापरून शिवीगीळ केली. आता भाजप कडे काही उत्तर आहे का.महापौरानी सुनील कांबळे वर कारवाई केली पाहिजे. महापौरानी सुनील कांबळे वर कारवाई करावी म्हणून आज आम्ही आंदोलन करत आहोत.
रूपाली ठोंबरे म्हणाल्या,आमदार सुनील कांबळे यांनी केलेला हा प्रकार भरपूर भयानक आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ राज्यात कोणत्याही महिले वर बलात्कार झाला तर मीडिया समोर सरकारने कारवाई करावी अशी मागणी करतात .
काल पासून त्या कुठे गेल्या.आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे सुनील कांबळे यांच्या वर कारवाई करण्याची मागणी करणार आहोत.
