Tuesday, June 16, 2026
Latest NewsSports

श्री महेश्वरानंद सरस्वती मेमोरियल महाराष्ट्र खुल्या रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत आठव्या फेरीअखेर आदित्य सामंत, विक्रमादित्य कुलकर्णी आघाडीवर  

पुणे : बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित 18व्या श्री महेश्वरानंद सरस्वती मेमोरियल महाराष्ट्र खुल्या रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत आठव्या फेरीअखेर रेल्वेच्या आयएम विक्रमादित्य कुलकर्णी, पुण्याच्या फिडे मास्टर आदित्य सामंत या खेळाडूंनी 7 गुणांसह आपली आघाडी कायम ठेवली आहे.

मनोहर मंगल कार्यालय, एरंडवणे, पुणे येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत रेल्वेच्या आयएम विक्रमादित्य कुलकर्णी याने पुण्याच्या नमित चव्हाणचा पराभव करून 7 गुण प्राप्त केले. चुरशीच्या झालेल्या लढतीत अहमदनगरच्या एफएम सुयोग वाघव पुण्याच्या एफएम आदित्य सामंत यांच्यातील सामना बरोबरीत सुटला. पुण्याच्या गौरव झगडे, सांगलीच्या आयएम समीर  काठमाळे, पुण्याच्या सिद्धांत गायकवाड, डब्लूआयएम आकांक्षा हगवणे यांनी 6.5गुण मिळवले. 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: आठवी फेरी(व्हाईट व ब्लॅक क्रमानुसार):
एफएम सुयोग वाघ(अहमदनगर)(6.5गुण)बरोबरी वि.एफएम आदित्य सामंत(पुणे)(7गुण);
नमित चव्हाण(पुणे)(6गुण)पराभूत वि.आयएम विक्रमादित्य कुलकर्णी(रेल्वे)(7गुण);
गौरव झगडे(पुणे)(6.5गुण)बरोबरी वि.आकाश दळवी(ठाणे)(6.5गुण);
आयएम समीर काठमाळे(सांगली)(6.5गुण)वि.वि.एफएम कशिश जैन(पुणे)(5.5गुण);
अखिलेश नगारे(अहमदनगर)(5.5गुण)पराभूत वि.सिद्धांत गायकवाड(पुणे)(6.5गुण);
निलेश माळी(पालघर)(5.5गुण)पराभूत वि.डब्लूआयएम आकांक्षा हगवणे(पुणे)(6.5गुण);
एफएम सोहम फडके(पुणे)(5गुण)पराभूत वि.आदित्य बारटक्के(ठाणे)(6.5गुण);
अक्षय बोरगावकर(पुणे)(5गुण)पराभूत वि.वेदांत पानेसर(मुंबई उपनगर)(6गुण);
धनश्री खैरमोडे(पुणे)(5गुण)पराभूत वि.निर्गुण केवल(पुणे)(6गुण);
साहिल शेजल(सातारा)(5गुण)पराभूत वि.ओम लामकाने(पुणे)(6गुण);
प्रदीप सूतार(पालघर)(5गुण)पराभूत वि.रिषभ गोखले(पुणे)(6गुण);
प्रज्वल आव्हाड(अहमदनगर)(5गुण)पराभूत वि.प्रतीक गेंगजे(रायगड)(6गुण);
धनंजय नागरगोजे(पुणे)(5गुण)पराभूत वि.अंजनेया पाठक(पुणे)(6गुण);
आर्यन सिंगला(पुणे)(4.5गुण)पराभूत वि.देवांश शहा(मुंबई उपनगर)(6गुण);

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading