महापालिकेतील महिला अधिकाऱ्याला अपशब्द वापरणाऱ्या आमदार सुनील कांबळे यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन
पुणे:भाजपचे पुणे कॅंटॉन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांनी महापालिकेच्या एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला अपशब्द वापरून शिवीगीळ केली. या निषेधार्थ पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ने आज आमदार सुनील कांबळे यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले.
हे आंदोलन आमदार सुनील कांबळे यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले, यावेळी आमदार सुनील कांबळे यांनी केलेल्या अपशब्दाचा निषेध करण्यात आला. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप ,महिला अध्यक्ष मृणाल वाणी, संतोष नागरे, गणेश मोहिते, नगरसेवक अश्विनी कदम,व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रशांत जगताप म्हणाले,आमदारा सुनील कांबळे यांनी महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ करतानाची मोबाईलवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. संबंधित महिला अधिकारी ह्या महापालिकेच्या ड्रेनेज विभागातील वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. त्यांच्याकडील एका कामासंदर्भात आमदार कांबळे यांनी एका कार्यकर्त्यांच्या मोबाईलवरून त्यांच्याशी संपर्क साधला. यावेळी संबंधित महिला अधिकाऱ्याने काही वरीष्ठ अधिकाऱ्यांची नावे घेता त्यांची परवानगी घ्यावी लागेल असे सांगितले. त्यावर चिडलेल्या कांबळे यांनी या महिला अधिकाऱ्याला अगदी घाणेरड्या शब्दात शिवीगाळ केली.हा घडलेला प्रकार एकदम घाणेरडा आहे.सुनील कांबळे हे आमदार आहेत.त्याना अशी भाषा वापरणे शोभत नाही.पुणे महानगरपालिके ची सत्ता भाजपच्या हातात आहे. भाजपने काहीही काम केले नाही. शहरातिल अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, दुसरीकडे भाजपचे आमदार महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ करतात आम्ही या घटनेचा निषेध करतो.
आम्ही पुणे पोलीस आयुक्तांकडे आमदार सुनिल कांबळे याची तक्रार करणार आहोत. असेही प्रशांत जगताप यांनी सांगितले.
