Sunday, September 27, 2026
Latest NewsPUNE

दलित युवकांना स्वावलंबी करण्यासाठी डिक्की आणि राजर्षी शाहू समूह एकत्रित काम करणार – समरजित राजे घाटगे

पुणे : शंभर वर्षापूर्वी दलित बहुजनांना नोकरीत आरक्षण व उद्योग व्यवसायात स्वावलंबी बनविण्याचे ऐतिहासिक कार्य राजश्री शाहू महाराज यांनी केले होते .आज दलित इंडीयन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ,(डीक्की) हा विचार आणि कार्य पुढे नेताना दिसतेय म्हणूनच शाहू समूह यापुढे डीक्की संस्थेबरोबर एकत्रित काम करून राजर्षी शाहू महाराज यांचे दलितांना उद्योगात स्वावलंबी बनविण्याचे स्वप्न आणि संकल्प पूर्ण करणार असल्याचे कोल्हापूर – कागल संस्थानचे राजे, राजश्री शाहू महाराज यांचे वंशज समरजित राजे घाटगे यांनी पुण्यात जाहीर केले. डीक्की संस्थेने दलीत उद्योजकांची कार्यशाळा आयोजित केली होती त्यावेळी राजे घाटगे यांनी आपला संकल्प जाहीर केला.
दलित इंडीयन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (DICCI) च्या कार्यक्रमात राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि त्यांचा कृतिशील वारसा या विषयावर संवाद साधला. दलित उद्योजकता विकासासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने कार्यरत असणारी DICCI संस्था आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या बहुजन विकासाचे स्वप्न घेवून प्रयत्नशील असणारा आमचा शाहू समूह या दोन्ही संस्था या महापुरुषांचा कृतिशील वारसा पुढे चालवत आहेत. यापुढील काळात एकत्रित येवून बहुजन विकासाचे स्वप्न साकार करू, असा मानस यावेळी राजे घाटगे यांनी व्यक्त केला.

डीक्की चे संस्थापक पद्मश्री मिलिंद कांबळे आपल्या मनोगतात म्हणाले की ,,राजश्री शाहू महाराज यांनी दलीत समाजाला व्यवसाय उभारण्यासाठी त्याकाळी मदत केली .गंगाराम कांबळे यांना हॉटेल सुरू करून दिले तसेच दलितांनी बनविलेला चप्पल हा ब्रँड जगभर पोहचविण्याचे कार्य केले .त्यांना भेटायला येणाऱ्या देश ,विदेशातील पाहुण्यांना राजभेट म्हणून चप्पल ते देत असत .भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामजिक कार्यास राजश्री शाहू महाराज यांनी अतिशय भक्कम असा पाठिंबा दिला होता .शिवाय विविध प्रकारे अतिशय मोलाचे सहकार्य केले होते .आंबेडकरांनी सुरू केलेले पहिले वृत्तपत्र ” मूकनायक ” ला शाहू महाराज यांनी अतिशय मोलाची मदत केल्याचे कांबळे यांनी यावेळी सांगितले .शिवाय आज ही तोच वारसा राजे करीत आहेत.असे म्हणाले .यावेळी राजश्री शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा व भेटीचे अनेक प्रसंग कांबळे यांनी यावेळी सांगितले . राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी प्रगतिशील आणि विकसित समाजाचे स्वप्न पाहिले होते. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या म्हणण्यानुसार " स्वप्न ते नव्हे जे झोपेत पडते तर स्वप्न ते असते जे झोप उडवून ते पूर्ण करायला आपल्याला भाग पाडते." शाहू समूहाने आणि डिक्कीने ही शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करण्याचे स्वप्न पाहिले आहे. आणि तेच पूर्ण करण्यासाठी आम्ही एकत्र येऊन एक नवा इतिहास निर्माण करणार असल्याचे राजे घाटगे म्हणाले.

यावेळी DICCI चे संस्थापक चेअरमन पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे, राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री रविकुमार नर्रा, राष्ट्रीय उपाध्यक्ष संजीव डांगी, वेस्ट इंडिया अध्यक्ष अविनाश जगताप, राष्ट्रीय मार्गदर्शिका ( महिला विभाग ) सीमा कांबळे, महाराष्ट्र अध्यक्ष आणि समन्वयक ( वेस्टर्न इंडिया ) संतोष कांबळे आणि सतीश कुलकर्णी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading