एचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत  केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय

पुणे : हेमंत पाटील(एचपी) प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत शुभम हरपाळे(4-23 व नाबाद 47धावा)याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर केडन्स क्रिकेट अकादमी संघाने पीवायसी हिंदू जिमखाना संघाचा 3 गडी राखून पराभव करत सलग तिसरा विजय नोंदविला. 
पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाच्या शुभम हरपाळे(4-23), सिद्धेश वरघंटे(2-20), अक्षय वाईकर(1-11), समद फल्ला(1-15), यतीन मंगवानी(1-15), इझान सय्यद(1-36)यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीपुढे पीवायसी हिंदू जिमखाना संघाचा डाव 18.1 षटकात 124 धावांवर आटोपला. यात श्रेयश वालेकरने 22 चेंडूत 4 चौकार व 1षटकारासह 37 धावांची खेळी केली. श्रेयशला रोहन दामलेने 26धावा करून सुरेख साथ दिली. या दोघांनी सहाव्या गड्यासाठी 44 चेंडूत 55 धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरण्याचा प्रयन्त केला. 
याच्या उत्तरात केडन्स क्रिकेट अकादमी संघाने हे आव्हान 19.3षटकात 7बाद 128धावा करून पूर्ण केले. सलामीचे फलंदाज ऋषिकेश मोटकर 12, हर्षल काटे 10धावांवर बाद झाल्यामुळे संघ 8 षटकात 5बाद 40 असा अडचणीत सापडला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या शुभम हरपाळेने 37 चेंडूत 3चौकार व 3षटकाराच्या मदतीने नाबाद 47 धावांची खेळी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. शुभमला आर्यन गोजेने 31 चेंडूत 36धावा करून चांगली साथ दिली. शुभम व आर्यन यांनी सहाव्या गड्यासाठी 53चेंडूत 58 धावांची महत्वपूर्ण भागीदारी करून संघाला विजय मिळवुन दिला. अष्टपैलू कामगिरी करणारा शुभम हरपाळे सामनावीर ठरला.
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी: 

पीवायसी हिंदू जिमखाना: 18.1षटकात सर्वबाद 124धावा(श्रेयश वालेकर 37(22,4×4,1×6), रोहन दामले 26(30,2×4,1×6), दिव्यांग हिंगणेकर 16, अमेय भावे 14, यश खळदकर 10, शुभम हरपाळे 4-23, सिद्धेश वरघंटे 2-20, अक्षय वाईकर 1-11, समद फल्ला 1-15, यतीन मंगवानी 1-15, इझान सय्यद 1-36)पराभूत वि.केडन्स क्रिकेट अकादमी: 19.3षटकात 7बाद 128धावा(शुभम हरपाळे नाबाद 47(37,3×4,3×6), आर्यन गोजे 36(31,4×4,1×6), ऋषिकेश मोटकर 12, हर्षल काटे 10, प्रदीप दाढे 3-16, आदित्य डावरे 2-25, रोहन दामले 1-27);सामनावीर-शुभम हरपाळे; केडन्स संघ 3 गडी राखून विजयी.

Leave a Reply

%d bloggers like this: