Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

आधार सोशल फाऊंडेशनतर्फे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा

पुणे : आधार सोशल फाऊंडेशनतर्फे पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त शुक्रवार पेठेतील आदर्श विद्यालय शाळेजवळ परिसरातील ७० ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करुन एकात्मता, मानवता या त्यांच्या विचारांचे स्मरण यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन फाऊंडेशनचे अध्यक्ष व माजी नगरसेवक दिलीप काळोखे यांनी केले. यावेळी नगरसेवक अजय खेडेकर, कसबा मतदार संघाचे सरचिटणीस राजेंद्र काकड,े छगन बुलाखे, अ‍ॅड. राणी कांबळे, यशोधन आखाडे, माऊली पासलकर यांसह अनिल काळोखे, सविता काळोखे, पुरण हुडके, श्याम केवटे, सचिन शुक्ला, राजेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.

दिलीप काळोखे म्हणाले, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी एकात्मता, मानवतावाद व अंत्योदय योजना हा मूलमंत्र भारतीय जनता पार्टी ला दिला. याच अनुषंगाने या देशाचे कार्यक्षम व यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करीत आहेत. सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू धरून नागरिकांकरिता विविध महत्त्वपूर्ण योजना राबविल्या जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading